E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात
Samruddhi Dhayagude
11 Apr 2025
जगप्रसिद्ध सीमेन्स कंपनीच्या अध्यक्षासह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात हडसन नदीत गुरुवारी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. न्यूयॉर्कचे महापौर एरिक ऍडम्स यांच्या मते, मृतांमध्ये एक वैमानिक आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही समावेश आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,अपघातानंतर दोन पीडितांना तत्काळ रुग्णालयात नेले होते, परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर या दुःखद अपघाताबद्दल पोस्ट केली. पोस्टमध्ये ते म्हणाले, “हडसन नदीत भयानक हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. पायलट, दोन प्रौढ आणि तीन मुले, आता आपल्यात नाहीत. अपघाताचा व्हिडिओ भयानक आहे. वाहतूक सचिव शॉन डफी आणि त्यांचे कर्मचारी या आपघाताची चौकशी करत आहेत. हा अपघात कसा झाला या बाबत सविस्तर माहिती देतील.”
मृतांमध्ये स्पेनमधील सीमेन्स कंपनीचे स्पेनमधील अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या आयुक्त जेसिका टिश यांच्या मते, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, दोन जखमींचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी दुपारी ३:१७ वाजता (अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार) घडली. होबोकेनमधील पियर ए पार्क येथे न्यू जर्सीच्या किनाऱ्याजवळ हडसन नदीत हेलिकॉप्टर अपघात झाल्याची माहिती देणारे बरेच फोन पोलिसांना आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितांना नदीतून बाहेर काढले.
दरम्यान या अपघाताचे व्हिडिओ एक्सवर व्हायरल होत आहेत, ज्यात अपघाताचे क्षण कैद झाले आहेत. काही क्लिप्समध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी ते हवेत भरकटताना दिसत आहे.
फ्लाईट रॅडर २४ नुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे नाव बेल २०६एल-४ लॉन्गरेंजर ४ असे आहे. ते २००४ मध्ये निर्माण करण्यात आले होते. नोंदींनुसार, २०१६ मध्ये त्याला उड्डाणाचे प्रमाणपत्र देण्यात आले होते.
Related
Articles
असह्य करामुळे श्रीमंतांचे स्थलांतर
22 Apr 2025
भिडे पूल दीड महिना राहणार बंद
19 Apr 2025
काँग्रेस भावनाबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने
18 Apr 2025
मार्केटयार्डात संत्र्याला विक्रमी दर एक किलोला २२२ रुपये दर
17 Apr 2025
तेजस्वी यांनी घेतली खर्गे, राहुल यांची भेट
16 Apr 2025
अश्विनी बिद्रे हत्याकांड अभय कुरुंदकर याला जन्मठेप

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!