शहरात विविध कामांसाठी रस्ते खोदाईची परवानगी   

पुणे : पुणे महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील १५ रस्ते सुसाट केले आहेत. त्यानंतर आता १७ रस्त्यांची कामे सुरु केली जाणार आहे. डांबरीकरण अथवा सिमेंट क्राँक्रीट केलेले रस्ते पुन्हा खोदले जाणार आहेत. पथ विभागाने नुकतीच शहरातील रस्ते खोदण्याची परवानगी दिली आहे.शहरामध्ये विविध रस्त्यांवर सेवा वाहिन्या टाकण्यासाठी विविध विभागाला खोदाईच्या परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. खोदाई करून खात्याची सेवावाहीनी टाकल्यानंतर खोदलेला भाग योग्य दर्जानुसार दुरुस्ती रस्त्याच्या पातळीत पूर्ववत करावी तसेच जागेवरील राडारोडा व टाकाऊ मटेरियल यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे या सर्व बाबी आपले खात्यामार्फत पूर्ण होणे आवश्यक आहे. 
 
नजिकच्या काळामध्ये पावसाळा सूरू होणार असून आपल्या विभागामार्फत करण्यात आलेल्या खोदाईमुळे वा खराब दर्जाच्या दुरुस्तीमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक वा पादचारी यांची गैरसोय होणार नाही. तसेच आपल्या विभागामार्फत करण्यात आलेल्या निकृष्ट कामांमुळे पथ विभागाचे संबंधित अधिकारी यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागणार नाही याची पूर्ण दक्षता संबंधित विभागाने घ्यावी.
 
१५ मे २०२५ पर्यंत झालेल्या सर्व खोदाईची दुरुस्ती ३१ मे २०२५ पर्यंत समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी. १ जून २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये कोणत्याही कामासाठी खोदाईची परवानगी पथ विभागामार्फत देण्यात येणार नाही. सर्व सूचना या संबंधित खात्यासाठी काम करणार्‍या सर्व ठेकेदारांना देण्यात याव्यात. दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही रस्त्यावर खोदाई केल्याचे आढळून आल्यास महापलिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित विभागावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी दिली.

Related Articles