शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंट   

ढाका : बांगलादेशाच्या न्यायालयाने गुरुवारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पदच्युत पंतप्रधान शेख हसीना, त्यांची मुलगी सायमा वाजिद पुतुल आणि इतर १७ जणांविरुद्ध नवीन अटक वॉरंट जारी केले आहे. हसीना यांच्यावर फसवणूक करून निवासी भूखंड मिळवल्याचा आरोप आहे.
 
ढाका महानगर वरिष्ठ विशेष न्यायाधीश झाकीर हुसेन गालिब यांनी भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (एसीसी) दाखल केलेले आरोपपत्र स्वीकारले आहे. शेख हसीना आरोपी फरार असल्याने बांगलादेशाच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले, असे एसीसीचे प्रतिनिधित्व करणारे वकील मीर अहमद सलाम यांनी पत्रकारांना सांगितले.
 
मीर अहमद सलाम म्हणाले, राजधानी ढाक्याच्या बाहेरील परबाचल परिसरात सरकारी राजधानी विद्यापीठ कंपनीने (राजूक) भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीशी संबंधित आरोपाच्या सुनावणीसाठी न्यायाधीशांनी एसीसीला ४ मे रोजी त्यांचा तपास अहवाल सादर करण्यास सांगितले. एसीसीने १२ जानेवारी २०२५ रोजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना इतर सहआरोपी आणिसरकारी अधिकार्‍यांविरुद्ध खटला दाखल केला होता.
 
 

Related Articles