दोन गटात दगडफेक; पाच गंभीर जखमी   

जालना : जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेकही करण्यात आली. याचवेळी एकजण चाकूने वार करत असताना पोलिसाने मध्यस्थी करत चाकू हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, दडफेकीत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर नातेवाईकाला भेटायला आलेल्या दोन कुटुंबात जुन्या वादातून शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर मारहाण करत एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. या घटनेत ५ जण जखमी झाले. पोलिस आल्यावर इतर आरोपी फरार झाले. या घटनेत अ‍ॅम्बुलन्सची काच फुटली आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, रुग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.   

Related Articles