मालमोटारीच्या धडकेत वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू   

वाशिम : मालमोटारीच्या धडकेत वडिलांसह चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी जखमी आहे. वाशिमच्या कारंजा-शेलुबाजार मार्गावरील मुरंबी फाट्याजवळ हा अपघात झाला. अंबादास जावळे (४५), त्यांची मुलगी आरती जावळे (१०) अशी मृतांची नावे आहेत. तर पत्नी उषा जावळे या जखमी आहेत. 
 
अंबादास जावळे हे आपल्या पत्नी आणि मुलीसोबत दुचाकीवरून कारंजा येथून धाकली किनखेड येथे जात होते. दरम्यान, मुरंबी फाट्याजवळ एका मालमोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अंबादास जावळे आणि त्यांची १० वर्षांची मुलगी आरती जावळे हिचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी उषा जावळे या अपघातात किरकोळ जखमी झाल्या आहेत.या अपघातानंतर मालमोटारचालक वाहनासह पसार झाला असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. उषा जावळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Related Articles