सोसायटीत मोटारींच्या शर्यतीचा थरार   

जाब विचारणा़र्‍यांना शिवीगाळ, दोन मोटारी जप्त

पुणे : वाघोली येथील न्याती एलान सेंट्रल साऊथ सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन मोटारींमध्ये शर्यतीचा (कार रेस) थरार पाहायला मिळाला. याबाबत रहिवाशांनी जाब विचारला असता, त्यांना दोघांनी दोघांनी शिवीगाळ करुन धमकी दिली. याप्रकरणी पालिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या मोटारी जप्त केल्या आहेत.
 
श्रेयश दीपक गोरे (वय १९) आणि साहिल संदीप गोरे (वय २०, दोघे रा. गोरे वस्ती, वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या महिंद्रा थार आणि महिंद्रा स्कॉर्पिओ या दोन मोटारी जप्त केल्या आहेत. आरोपींनी त्यांच्या मोटारी बुधवारी दुपारी बाहेर काढल्या आणि सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर शर्यत लावली. याबाबत सोसासटीतील रहिवाशांनी जाब विचारला असता, त्यांनी रहिवाशांना शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघोली वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करुन दोन्ही गाड्या जप्त केल्या आहेत.  वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक मनोज बागल, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Related Articles