बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुरुवात झाली. न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्या पीठासमोर हे प्रकरण सुनावणीस आहे. या सुनावणीबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, आरोपी वाल्मिक कराड याने मी निर्दोष असून, या प्रकरणाशी माझा संबंध नाही, असा दावा केला आहे. त्याने खटल्याशी संबंधित कागदपत्रांची न्यायालयाकडे मागणी केली होती. ती सीआयडीमार्फत न्यायालयामध्ये सादर केली. पण, काही दस्तावेज सीलबंद आहेत. देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायालयात हजर केला. व्हिडीओ आरोपींनीच रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ बाहेर येऊ नये, अशा विनंती न्यायालयाला केली, असेही निकम म्हणाले. आता पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे.
Fans
Followers