सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी   

गर्दीचे नियोजन चुकले; चेंगराचेंगरीची परिस्थिती

नाशिक : चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगी गडावर भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मात्र, गर्दीचे नियोजन चुकले. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. याबद्दल भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर, प्रशासन आणि पोलिसांची यावेळी तारांबळ उडाली.चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगीगडावर आदिमायेचे दर्शनासाठी बुधवारी रात्रीपासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अचानक गर्दी वाढल्याने पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिस, आपत्ती व्यवस्थापन आणि मंदिर प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.
 
या चेंगराचेंगरीच्या अनेक चित्रफिती समोर आल्या आहेत. ज्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे. आदिमायेचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून दर्शन मार्गात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी बॅरिकेड्स तुटल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी लहान मुले, वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, प्रशासनाचा हा नियोजनशून्य कारभार पाहून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सप्तश्रृंगी गडावर सध्या चैत्रोत्सव सुरू आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेला हा उत्सव हनुमान जयंतीपर्यंत सुरू असतो. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. 
 

Related Articles