दिल्लीचा सहा फलंदाज राखून विजय   

बंगळुरु  : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मंगळवारी आयपीएलचा २४ वा सामना खेळला गेला. हा सामना दिल्लीच्या संघाने ६ फलंदाज राखून जिंकला.प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुच्या संघाने २० षटकांत १६३ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीच्या संघाला १६४ धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा अनुभवी फलंदाज लोकेश राहुल याने नाबाद 93 धावा करत सामना दिल्लीच्या संघाला जिंकून दिला. त्याला साथ देताना अक्सर पटेल याने १५ धावा आणि त्रिशान स्ट्ब्ज याने नाबाद ३८ धावा केल्या. ७ अवांतर धावा दिल्लीला मिळाल्या. त्यामुळे दिल्लीचा संघ 169 धावा करू शकला. 
 
त्याआधी दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर बंगळुरुचे फलंदाज झटपट बाद झाले. दिल्लीच्या कुलदीप यादव याने २ बळी तर मुकेश कुमार याने १ फलंदाज बाद केला. विपराज निकम याने २ फलंदाज बाद केले. तर मोहीत शर्मा याने देखील १ बळी मिळविला. बंगळुरुच्या फलंदाजांपैकी फिल सॉल्ट याने ३७ धावांवर बाद झाला. त्यानंतर तो धावबाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली हा अवघ्या २२ धावांवर बाद झाला. विपराज निकम याने शानदार गोलंदाजी करत मिचेल स्टार्ककडे त्याला झेलबाद केले.पड्डीकल हा सर्वोत्तम धावा करेल असे वाटत होते मात्र तो अवघी १ धाव काढून बाद झाला. रजत पाटीदार याने २५ धावा केल्या. कुलदीप यादव याच्या भेदक गोलंदाजीवर के.एल राहुलकडे तो झेलबाद झाला. लिव्हिगस्टोन याने ४ धावा केल्या. मोहीत शर्मा याने शानदार गोलंदाजी करत अशुतोष शर्माकडे त्याला झेलबाद केले. जितेश शर्मा याने ३ धावा केल्या. कुलदीप यादव याने राहुलकरवी त्याला झेलबाद केले. कृणाल पांड्या याने १८ धावा केल्या. विपराज निगम याने जबरदस्त गोलंदाजी करत अशुतोष शर्माकडे त्याला झेलबाद केले. टिम डेव्हिड याने नाबाद ३७ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक दिल्ली : लोकेश राहुल नाबाद ९३,अक्सर पटेल १५,स्ट्ब्ज नाबाद ३८, अभिषेक ७, प्लेसीस २ एकूण १७.५ षटकांत १६९/४ बंगळुरु : फिल सॉल्ट ३७, कोहली २२, पड्डीकल १, रजत पाटीदार २५,टिम डेविड ३७, एकूण २० षटकांत १६३/७

Related Articles