पाकिस्तानने आठ हजारांहून अधिक अफगाण निर्वासितांना केले हद्दपार   

इस्लामाबाद : पाकिस्तानने सुरू केलेल्या कारवाई अंतर्गत आठ हजारांहून अधिक अफगाण निर्वासितांना हद्दपार केले.’अफगाण नागरिक कार्ड’ (एसीसी) धारकांच्या स्वेच्छेने परतफेडीची अंतिम मुदत ३१ मार्च रोजी संपल्यानंतर या कारवाईला वेग आला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिलपासून सुमारे आठ हजार ११५ अफगाणिस्तानवासी, ज्यापैकी बहुतेकांना पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून पकडले गेले होते, त्यांना तोरखम सीमेवरून परत पाठवले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने आतापर्यंत पाच हजारांहून अधिक अफगाणिस्तानवासीयांना ताब्यात घेतले.
 
अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पंजाबमध्ये बेकायदा राहणार्‍या सुमारे एक लाख अफगाणिस्तानची ओळख पटली असून, त्यांना लवकरच देशातून हद्दपार केले जाईल. हा या कारवाईचा दुसरा टप्पा आहे. ज्यामध्ये एसीसी धारकांना लक्ष्य करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२३ पासून पहिल्या टप्प्यात आठ लाखांहून अधिक अफगाणिस्तान्यांना परत पाठवले आहे. १९८० च्या दशकात सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर लाखो अफगाणिस्तानचे नागरिक पाकिस्तानात आले होते.
 

Related Articles