तहव्वुर राणाला घेऊन NIA पथक दिल्‍लीत दाखल   

दिल्ली : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला आज भारतात आणले. एनआयए आणि गुप्तचर संस्था 'रॉ' यांचे संयुक्त पथक बुधवारी एका विशेष विमानाने तहव्वूरसोबत रवाना झाले. त्याला कडक सुरक्षेत भारतात आणले गेले.
 
एनआयए आणि 'रॉ' टीमच्या सुरक्षेत ते आज दुपारी एका खास विमानाने दिल्ली विमानतळावर उतरले. भारतात पोहोचताच एनआयए टीम त्याला अधिकृतपणे ताब्यात घेईल. यानंतर, राणाला बुलेटप्रूफ कारमधून एनआयए मुख्यालयात नेले जाणार आहे. एनआयए मुख्यालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे.आरोपी तहव्वुर राणा याला आज (दि. १०) राष्‍ट्रीय तपास संस्‍थेच्‍या (NAI) मुख्यालयात आणले जाणार आहे. त्‍याला गुरुवारी अमेरिकेने प्रत्यार्पण केले होते. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील बऱ्याच भागात सुरक्षा वाढवली आहे.
 
राणा पालम विमानतळावरून बुलेटप्रूफ वाहनातून राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) मुख्यालयात पोहोचणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला सतर्क ठेवले आहे. विमानतळावर SWAT (विशेष शस्त्रे आणि रणनीती) कमांडो आधीच तैनात करण्यात आले आहेत.
 
एनआयए मुख्यालयात एक चौकशी कक्ष तयार करण्यात आला आहे. एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांच्यासह फक्त १२ सदस्यांना प्रवेश देण्यात आला असल्‍याचे वृत्त खासगी वृत्तसंस्थेने दिले.
 

https://twitter.com/PTI_News/status/1910244138647158879

Related Articles