पासपोर्ट प्रणालीमध्ये सर्व्हर बिघाड   

मोठ्या शहरांमध्ये अर्जदार गोंधळात

चंदीगड: चंदीगडमधील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात (आरपीओ) तांत्रिक बिघाडामुळे शेकडो पासपोर्ट अर्जदार आणि त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय झाली. आरपीओ सर्व्हरमधील समस्येमुळे, सर्व पासपोर्ट सेवा केंद्र (PSKs) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSKs) मधील सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या.
 
हे कार्यालय पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि आसपासच्या भागातील लोकांना पासपोर्टशी संबंधित सुविधा पुरवते, मात्र काल सर्व्हर डाऊन झाल्यामुळे काम बंद झाले. मात्र आज सर्व्हर सुरळीत सुरु करण्यात आला आहे. कार्यालयात पूर्वीप्रमाणेच पासपोर्टचे काम सुरू आहे.आठवड्यातील पाच दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू असलेल्या पासपोर्ट कार्यालयात दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. अनेक अर्जदार त्यांच्या नियोजित वेळेत औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सकाळी लवकर पोहोचतात, मात्र बुधवारी त्यांना तासंतास प्रतीक्षा करावी लागली.तांत्रिक अडचणींमुळे पासपोर्ट, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) आणि जीईपी भेटी रद्द कराव्या लागल्या.

Related Articles