महागाई वाढीचा दर मर्यादित राहील   

मुंबई : चालू आर्थिक वर्षात महागाई वाढीचा दर मर्यादित राहील, असे रिझर्व बँकेने म्हटले आहे. यासोबतच, २०२५-२६ मध्ये चलनवाढीचा दर ४.२ टक्क्यांवरुन कमी करत ४ टक्के राहील, असाही अंदाज वर्तविला आहे.
 
यंदा कृषी क्षेत्राची वाढ चांगली राहू शकते. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या घसरलेल्या किमतीमुळे महागाई दरात घट होऊ शकते, असेही रिझर्व बँकेने म्हटले आहे. दरम्यान, जागतिक व्यापार युद्ध आणि इतर बाजारपेठांमध्ये चलनातील व्यापक बदल होत असताना रुपया बराच स्थिर आहे. गरज पडल्यास रुपयावरील कोणताही दबाव हाताळण्यासाठी रिझर्व बँकेकडे पुरेसा परकीय चलन साठा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles