बांगलादेशात इस्रायलविरोधी आंदोलकांचा दुकानांवर हल्ला   

५६ जणांना अटक

ढाका : बांगलादेशच्या विविध भागांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करणार्‍या शेकडो नागरिकांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांसह व्यावसायिक प्रतिष्ठानांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी तोडफोडीमध्ये सहभागी असलेल्या ५६ जणांना अटक केली.पॅलेस्टिनींशी एकजूट दाखवण्यासाठी आणि गाझावरील इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विविध शहरांमध्ये निषेध रॅली काढण्यात आल्या होत्या. सिल्हेट, चटगाव, खुलना, बरीशाल, कुमिला आणि ढाका येथे जमावाने बाटा शू, केएफसी आणि डोमिनोज पिझ्झा शॉप्ससह दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर हल्ले करण्यास सुरुवात केल्यावर निदर्शने हिंसक झाली. पोलिसांनी घटनेची चित्रफीत पाहून ५६ जणांना अटक केली. इतरांची ओळख पटवण्यासाठी  सीसीटिव्ही तपासले जात आहेत. जोपर्यंत या हिंसाचारातील सर्व आंदोलक पकडले जात नाहीत तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी सांगितले. 
 
दरम्यान, ही तोडफोड हंगामी सरकारने आयोजित केलेल्या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेच्या आधी झाली. बांगलादेश परदेशी आणि देशांतर्गत दोन्ही गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याने जागतिक उद्योजकांना आकर्षित करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. 

Related Articles