बनेश्वर ते नसरापूर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे आंदोलन   

पुणे : भोर तालुक्यातील बनेश्वर ते नसरापूर या दीड किलोमीटर रस्त्याची डागडुजी करावी, या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे ५ तास ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर खासदार सुळे यांनी लिंबू सरबत पिऊन आंदोलन मागे घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार रमेश थोरात, माजी नगरसेवक विजय कोलते, बबूसाहेब माहूरकर, स्वाती पोकळे यांच्यासह बनेश्वर भागातील नागरिक उपस्थित होते.
 
खासदार सुळे म्हणाल्या, बनेश्वर हे अस्थेचे ठिकाण आहे. मागच्या सहा महिन्यापासून बनेश्वर ते नसरापूर रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे.दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी सरकार छळत आहे. येथील नागरिक नवीन रस्ता मागत नाही, रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्याची डागडुजी केली जावी, ही मागणी आहे. दुर्देवाने हे सरकार डागडुजी सुद्धा करत नाही. पीएमआरडीच्या माध्यमांतून ९०० कोटीचा नवीन प्रकल्प उभारत आहेत. त्याचे आम्ही स्वागत करतो. यात राजकारण आणायचे नाही. हा श्रद्धेचा विषय आहे. बनेश्वर हा महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली असून, त्याची डागडुजी करण्याची विनंती सरकारकडे केली आहे. 
 
धोरणात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत उठणार नाही. या रस्त्याबाबत प्रशासनावर विश्वास ठेऊन सहकार्याची भूमिका घेतली आहे. रस्त्याचे काम सुरू करतो, असे म्हणाले होते. मात्र, ते त्यांनी केले नाही. यावर किती वेळा विश्वास ठेवायचा. आमचा विश्वासघात झाला आहे. या गावकर्‍यांना कोणत्या तोंडाने उत्तर देऊ. गावकर्‍यांची दीड किलोमीटर रस्त्याची मागणी आहे. स्थानिक आमदाराबाबत मला काही माहित नाही. शांततेच्या मार्गाने मागणी मांडण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
 
दीनानाथ रुग्णालयावर हत्येचा गुन्हा दाखल करावा
 
५ हजार रुपयांच्या कर थकला तर महापालिका घरासमोर जाऊन बॅण्ड वाजवते. २७ कोटी बुडवले तर महापालिका साधा शब्द काढत नाही. ४८ तासात काही कारवाई केली नाही, तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू, असाही इशारा खासदार सुळे यांनी दिला. यामुळे महापालिका कारवाईच्या भूमिकेत तरी आली. निदान आता नोटीस तरी पाठवली आहे. दीनानाथ हॉस्पिटलमधील घडलेल्या प्रकारात डॉक्टरांची चुकीच आहे. या महिलेस साडेपाच तास कळा येत होत्या. तिला रक्तस्त्राव होत होता. तिला तयार करून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. ही हत्याच आहे. प्रशासनातील लोकांचा सहभाग आहे. आम्ही या प्रकरणात राजकारण आणलं नाही. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये कारवाई करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा, अशीही मागणी खासदार सुळे यांनी केली.
 
विमानतळासाठी शेतकर्‍यांशी संवाद साधावा
 
आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र, लोकांना आत्मविश्वास द्यावा. घराजवळ विमानतळ होत असेल, तर सरकारने शेतकर्‍यांशी संवाद साधावा. त्यांना किती पैसे देणार आहोत, हे सांगावे याची चर्चा करावी. रेटून चालणार नाही

Related Articles