’इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ उद्यापासून पडद्यावर   

’इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा शीर्षकापासूनच चर्चेचा विषय असलेला हा चित्रपट ११ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.या मराठी चित्रपटाची निर्मिती नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. दिग्दर्शन प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी केले आहे. या दिग्दर्शक द्वयींनी आपल्या चित्रपटाद्वारे उत्कंठावर्धक विषय सादर केला आहे. 
 
या चित्रपटाच्या निमित्ताने सयाजी आणि गिरीश यांनी प्रथमच एकत्र काम केले आहे. दोघेही तगडे कलाकार असून, दोघांचीही आपापली वेगळी अभिनयशैली आहे. दोघेही शिक्षकी भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे.संतोष शिंत्रे यांनी ’इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची कथा लिहिली असून, तर प्रसाद नामजोशी यांनी दिग्दर्शनासोबतच पटकथा, संवाद आणि गीतलेखनसुद्धा केले आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, अपूर्वा चौधरी, प्रगल्भा कोळेकर, कृतिका देव, हरीश थोरात, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, शिवराज वाळवेकर आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहे.

Related Articles