पोलिस अधिकार्‍याच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न   

पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात श्री रामनवमीनिमित्त रविवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुक दरम्यान वाहतूक नियोजन करणार्‍या एका सहाय्यक पोलिस आयुक्त अजय परमार यांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एका मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
पोलीस शिपाई श्रावण शेवाळे यांनी याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धायरीतील मुक्ताई गार्डनजवळून रविवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी एकाने मोटार गर्दीत घातली. वाहतूक नियोजन करणारे सहाय्यक पोलिस आयुक्त अजय परमार यांनी मोटारचालकाला मोटार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, मोटारचालकाने मोटार न थांबविता उलट त्यांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोटार अडवली. तेव्हा रस्त्याच्या मधोमध मोटार लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. दरम्यान, मोटारचालकाने पोलिसांशी झटापट केली. संधी साधत मोटारचालक आणि त्याच्याबरोबर असलेला साथीदार फरारी झाला. पुढील तपास पोलीस हवालदार कुंभार करत आहेत.

Related Articles