साई सुदर्शनमुळे गुजरातचा विजय   

अहमदाबाद : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्तान रॉयल्स यांच्यात झालेल्या आयपीएलच्या २३ व्या सामन्यात गुजरातच्या संघाने २० षटकांत २१७ धावा केल्या. यावेळी ६ फलंदाज गमावले. या सामन्यात गुजरातचा युवा फलंदाज साई सुदर्शन याने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्याच्या संयमी अर्धशतकामुळे गुजरातला ५८ धावांनी सामना जिंकता आला. 
 
साई सुदर्शन याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. तुषार देशपांडे याने शानदार चेंडू टाकत सॅमसनकडे त्याला झेलबाद केले. त्यानंतर त्याला साथ देणारा शुभमन गिल अवघ्या २ धावांवर बाद झाला. त्याचा त्रिफळा आर्चर याने उडविला. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर आलेला जोस बटलर याने २५ चेंडूत ३६ धावा केल्या. बटलर याने ५ चौकार मारले. बटलर याला महेश तिकक्ष्णा याने  पायचित बाद केले. त्याला साथ देणारा शाहरुख खान याने ३६ धावा करत महेश तिकक्ष्णा याच्या गोलंदाजीवर बाद झाला. 
 
शेरफन रुदरफोर्ड याने ७ धावा करून संदीप शर्माच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनकडे झेलबाद झाला. राहुल तेवटिया याने नाबाद २४ धावा केल्या. त्यानंतर राशिद खान हा फक्त १२ धावांवर बाद झाला. त्याला तुषार देशपांडे याने शानदार गोलंदाजी करत यशस्वी जैस्वालकडे झेलबाद केले.अर्शद खान शून्यावर नाबाद राहिला. तर गुजरातला १८ अवांतर धावा मिळाल्या. 
 
त्यानंतर २१८ धावांचे आव्हान पार करण्यासाठी आलेला राजस्तानच्या संघाने १९.२ षटकांत १५९ धावा केल्या. यावेळी राजस्तानच्या फलंदाजांपैकी सलामीवीर जैस्वाल ६ धावांवर अर्शद खान याच्या गोलंदाजीवर राशीद खानकडे झेलबाद झाला. संजू सॅमसन याने ४१ धावा केल्या त्याला प्रसिद्ध कृष्णा याने चकविणारा चेंडू टाकत साई किशोरकडे झेलबाद झाला. नितीश राणा याने १ धाव करत सिराजच्या गोलंदाजीवर कुलवंतकडे झेलबाद झाला. हॅटमायर याने ५२ धावा करत अर्धशतक केले. सामना जिंकणार असे वाटत असताना प्रसिद्ध कृष्णा याच्या गोलंदाजीवर साई किशोरकडे तो झेलबाद झाला. ध्रुव ज्युरेल आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी ५ धावा केल्या. तुषार देशपांडे ३ आणि महेश हा ५ धावांवर बाद झाला. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
गुजरात : साई सुदर्शन ८२, गिल २, बटलर ३६, शाहरुख खान ३६, रुदरफोर्ड ७, राहुल तेवटिया नाबाद २४, राशीद खान १२, एकूण २० षटकांत २१७/६
राजस्तान : संजू सॅमसन ४१, जैस्वाल ६, नितीश राणा १, रियान पराग २६, हॅटमायर ५२, आर्चर ४, दुबे १,  तुषार देशपांडे ३, संदीप शर्मा ६ एकूण १९.२ षटकांत १५९/१०

Related Articles