एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी बचावले   

सातारा : सातारा-लातूर मार्गावर एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाने प्रसंगावधान राखून बस नाल्यात उतरविल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. बसमधून ५२ प्रवासी प्रवास करत होते.सातारा-लातूर मार्गावर कोरेगावकडे जाणार्‍या बसचे ब्रेक त्रिपुटी खिंडीत (ता कोरेगाव) अचानक निकामी झाले. चालकाने प्रसंगावधान राखून बस नाल्यात उतरविल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. त्यामध्ये कोणतीही जीवित आणि झाली नाही. मात्र प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. दुसरी बस आल्यानंतर प्रवासी पुढच्या प्रवासाला रवाना झाले. मागील अनेक दिवसांपासून सातारा विभागीय एसटी कार्यालयातील बस नादुरुस्त आहेत. त्यामुळे अनेक मार्गावर त्यांचे ब्रेक नादुरुस्त होणे, बंद पडणे अशा घटना घडत आहेत. 
 
पाचवड-सातारा महामार्गावर वाई आगारातून सातार्‍याला जाणार्‍या बस ही भर उन्हात बंद पडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.राज्यात इतरत्र मोठ्या प्रमाणात नवीन बसचा पुरवठा पुरवण्यात आल्या आहेत. मात्र, सातारा विभागात अद्याप पर्यंत फार थोड्या नवीन बस आलेल्या आहेत. त्यामुळे जुन्या झालेल्या बस ही दुरुस्त करून लांबच्या पल्यावर सोडल्या जात आहेत. या प्रवासात बस बंद पडल्यास प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपायोजना करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
 

Related Articles