अपघातात युवकाचा मृत्यू   

सातारा : अडुळपेठ येथे रात्री साडेआठ वाजता मोटारसायकल व मालमोटारीच्या अपघातात येराड येथील युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर मालमोटार चालक वाहनासह पसार झाला आहे. नारायण तुकाराम साळुंखे असे मृत युवकाचे नाव आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कर्‍हाड-चिपळूण महामार्गावरून कर्‍हाडकडून दोन्ही वाहने पाटणकडे निघाली होती. अडुळपेठ गावच्या बसथांब्यावर ट्रक चालकाने वेगात मोटारसायकलला धडक दिली. त्यामध्ये मोटारसायकल चालक नारायण साळुंखे याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक वेगाने नेऊन पोबारा केला.

Related Articles