शाळेच्या बसखाली विद्यार्थ्याचा अंत   

नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! 

सोलापूर : शाळेच्या बसच्या चाकाखाली डोके आल्याने एक विद्यार्थी मृत्युमुखी पडला. ही घटना मंगळवारी दुपारी उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव - बेलाटी रस्त्यावर घडला असून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. अनुराग तिप्पण्णा राठोड (वय १३, रा. बसवेश्वर नगर, देगांव) असे विद्यार्थ्यांचे नाव असून तो कवठे येथील संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रम शाळा येथे शिकत आहे. 
 
घटनेची माहिती मिळताच सलगरवस्ती चौकीतील पोलीस घटनास्थळी पोहचून अपघातास कारणीभूत असलेली शाळेची बस ताब्यात घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत. या शाळेच्या बस मधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करत होते. व चालत्या गाडीतून मृत विद्यार्थी खाली पडला व याच गाडीची चाके त्याच्या डोक्यावरुन गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
 
हॉस्पिटलमध्ये नागरिक व मृताचे नातेवाईक यांची गर्दी झाली. संबधित बस चालक व शाळा संस्था चालकांवर गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,असा आक्रमक पवित्रा घेतला.

Related Articles