E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी चार लाख कोटींचे सामंजस्य करार
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआर) क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी मंगळवारी ४ लाख ७ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे एमएमआरमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
वांद्रे कुर्ला संकुलातील जियो वर्ल्ड सेंटर येथे आयोजित इंडिया ग्लोबल फोरम २०२५ च्या कार्यक्रमात हे करार करण्यात आले. केंद्र सरकारच्या विद्युत मंत्रालयाच्या महारत्न कंपनी असलेल्या आरईसी लिमिटेड, पावर फायनान्स कॉर्पोरेशन, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हुडको), इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, नॅशनल बँक फॉर फायनान्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट यासारख्या मिनिरत्न, महारत्न आणि नवरत्न कंपन्यांसोबत सामंजस्य करार केल्याने त्याचे अधिक महत्त्व वाढले आहे. तसेच, युनिलिव्हर कंपनीच्या मॅग्नम आइस्क्रीम व्यापारासाठीचे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, पुणे येथे उभारण्याचा सामंजस्य करारही यावेळी करण्यात आला. या केंद्रामध्ये ९०० कोटींची गुंतवणूक होणार असून ५०० रोजगार उपलब्ध होणार आहेत.
एकट्या एमएमआर क्षेत्रामध्ये दीड ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची क्षमता आहे. कालच्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीस मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. तसेच, युनिलिव्हर कंपनी सोबत झालेल्या करारामुळे पुण्याच्या विकासासाठी फायदा होणार आहे. पुणे शहरात मोठ्या संधी आहेत. या करारामुळे या संधीमध्ये वाढ होऊन रोजगार निर्मिती सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचे स्थान उंचावणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
एमएमआर क्षेत्राला २०३० पर्यंत ३०० बिलियन डॉलरच्या जीडीपी पर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी १३५ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक प्राप्त करणे आवश्यक आहे. यामुळे आणखी २८ ते ३० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल. राज्याने गेल्या तीन वर्षांत गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केले आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि मजबूत सरकार यामुळे महाराष्ट्र हे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक व्यवसायांसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला हुडकोचे अध्यक्ष संजय कुलक्षेत्र, आरईसी आणि पीएफसीचे अध्यक्ष परमिंदर चोप्रा, आयआरएफसीचे संचालक शेली वर्मा, एनएबीएफआयडीचे व्यवस्थापकीय संचालक राजकीरण राय, मॅग्नम आइस्क्रीम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित भटाचार्य, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगम आदी उपस्थित होते.
Related
Articles
बंगळुरुचा सात फलंदाज राखून विजय
21 Apr 2025
तेरुंगण तलावाला गळती; पाणी पातळीत घट
18 Apr 2025
दुकानातील आठ लाखाचे कापड चोरणार्यास अटक
22 Apr 2025
’कला उत्सव’मधून अवतरणार ’चित्र’ कलेची दुनिया
18 Apr 2025
पुढील हजार वर्षांचा विचार करुन धोरण आखले : मोदी
22 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
बंगळुरुचा सात फलंदाज राखून विजय
21 Apr 2025
तेरुंगण तलावाला गळती; पाणी पातळीत घट
18 Apr 2025
दुकानातील आठ लाखाचे कापड चोरणार्यास अटक
22 Apr 2025
’कला उत्सव’मधून अवतरणार ’चित्र’ कलेची दुनिया
18 Apr 2025
पुढील हजार वर्षांचा विचार करुन धोरण आखले : मोदी
22 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
बंगळुरुचा सात फलंदाज राखून विजय
21 Apr 2025
तेरुंगण तलावाला गळती; पाणी पातळीत घट
18 Apr 2025
दुकानातील आठ लाखाचे कापड चोरणार्यास अटक
22 Apr 2025
’कला उत्सव’मधून अवतरणार ’चित्र’ कलेची दुनिया
18 Apr 2025
पुढील हजार वर्षांचा विचार करुन धोरण आखले : मोदी
22 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
बंगळुरुचा सात फलंदाज राखून विजय
21 Apr 2025
तेरुंगण तलावाला गळती; पाणी पातळीत घट
18 Apr 2025
दुकानातील आठ लाखाचे कापड चोरणार्यास अटक
22 Apr 2025
’कला उत्सव’मधून अवतरणार ’चित्र’ कलेची दुनिया
18 Apr 2025
पुढील हजार वर्षांचा विचार करुन धोरण आखले : मोदी
22 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
2
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
3
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
4
राज-उद्धव एकत्र येणार?
5
ससूनचा अहवाल सादर
6
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!