भैरवनाथ चैत्री उत्सवाला १३ एप्रिलपासून सुरुवात   

सासवड (वार्ताहर) : भैरवनाथ चैत्री उत्सव समितीच्या वतीने १३ एप्रिल पासून सुरू होणार्‍या चैत्री उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून याची माहिती लोकांना व्हावी यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
 
१३ एप्रिल रोजी सकाळी साडे पाच वाजता देवांना मंदिरात अभिषेक करण्यात येईल. ७.०० वाजता धज बांधणे, नऊ वाजता पारंपरिक बगाडाचा कार्यक्रम होईल. यावेळी वाघ डोंगर पायथा या ठिकाणी बैलगाडी शर्यत कार्यक्रम सुरू होईल. सायंकाळी ६.०० वाजता भैरवनाथाची पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी प्रस्थान ठेवेल. पालखीची ग्राम प्रदक्षिणा करून आल्यानंतर भैरवनाथ मंदिरासमोरच छबिणा स्पर्धांचा कार्यक्रम होईल. १४ एप्रिल रोजी भैरवनाथ कुस्ती स्टेडियम या ठिकाणी दुपारी ४.०० वाजता कुस्ती आखाडा सुरू होईल. सहकार महर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या स्मरनार्थ माजी आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या वतीने यात्रेच्या आखाड्यात शेवटची कुस्ती रुपये १ लाख इनाम देऊन लावण्यात येईल. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ८.०० वाजता पालखीतळ क्रमांक २ सोपाननगर या ठिकाणी नाद करा पण आमचा कुठं हा आर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल. १६ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता पालखीतळ क्रमांक एक वर छावा चित्रपट दाखविण्यात येईल असे चैञी उत्सव मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शिरसागर यांनी दिली. 
 
१७ एप्रिल रोजी सायंकाळी ८.०० वाजता पालखीतळ क्रमांक २ या ठिकाणी पुरंदर गोल्डन सिंगर ग्रुप यांचा जल्लोष चैत्री उत्सवाचा हा मराठी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम होईल. १९ एप्रिल रोजी सायंकाळीं ६.०० वाजता ग्रामरत्न पुरस्काराचे वितरण यात काळभैरवनाथ मंदिरासमोर कालभैरवनाथ ग्रामरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच स्वर्गीय नारायण गेनोजी जगताप यांच्या समनार्थ उत्कृष्ट मंदिर व्यवस्थापन हा पुरस्कार देखील देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी धन्य सत्संगचा निरंकार या सतसंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती चैत्री उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश जगताप यांनी दिली.  १९ एप्रिल रोजी हनुमान भजनी सेवा मंडळ यांचा भैरवनाथ मंदिर या ठिकाणी रात्री आठ वाजता पारंपरिक भजनाचा कार्यक्रम होऊन चैत्री उत्सव यात्रेची सांगता होईल, अशी माहिती चैत्री उत्सव मंडळाच्या वतीने रविंद्रपंत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
यावेळी भैरवनाथ शेतकरी उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र अर्जुन शिरसागर उपाध्यक्ष प्रकाश जगताप, तसेच काळ भैरवनाथ मंडळ ट्रस्ट सासवडचे अध्यक्ष रमेश रामराव जगताप यांनी दिली. उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव भोंगळे, विस्वस्थ विजयबाप्पू जगताप, पोपट जगताप, दिपक जगताप, प्रशांत भैरवकर, गिरी गोसावी महाराज, सुरेश जगताप, तुकाराम गिरमे, सचिव सुरेश शिंदे, आदी उपस्थित होते.

Related Articles