पुणे : महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा या संस्थेतर्फे ‘भाषा इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेजेस अँड संस्कृत’ची स्थापना करण्यात आली आहे. या इन्स्टिट्यूटतर्फे नव्या शैक्षणिक वर्षापासून परकीय भाषा आणि संस्कृतचे अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत.जूनच्या प्रारंभी संस्कृतसह जपानी, चिनी आणि जर्मन भाषेचे प्राथमिक कोर्सस सुरू होणार असल्याची माहिती संस्थेच्या सचिव रेखा पळशीकर आणि ‘भाषा इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेजेस अँड संस्कृत’च्या संचालिका मधुरा गोखले यांनी दिली. हे वर्ग हुजूरपागेच्या विद्यार्थिनींसाठी नसून सर्वांसाठी खुले असतील. नोकरी-व्यवसाय करणार्यांची सोय म्हणून हे वर्ग सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० या वेळेत व शनिवार, रविवारी घेतले जाणार आहेत. एका वर्गात पंधरा विद्यार्थी असणार आहेत. भाषा इन्स्टिट्यूटविषयी अधिक माहितीसाठी ०२०-२४४५५४८४ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत (शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी सोडून) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Fans
Followers