’एक्सक्युज मी’ म्हटल्याने महिलेला मारहाण   

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागात मंगळवारी सकाळी एक महिला आपल्या सोसायटीच्या आवारात दुचाकी घेऊन जात होती. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर एक तरूण उभा होता. त्याला महिलेने ’एक्सक्युज मी’ म्हणत त्या तरूणाला सोसायटी प्रवेशद्वारातून बाजुला होण्याची विनंती केली. त्या तरूणाने काही क्षणात मागे फिरून मराठीतून बोला, असे म्हणत दुचाकीवरील महिलांना धमकावले.
 
मराठीतून बोला असा आग्रह तरूणाने धरला. परंतु त्या महिलेने मराठीतून बोलत नाही म्हटल्यावर तरूणाने दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या महिलेचा हात पिरगटुन तिला मराठी कशी बोलत नाहीस, असा प्रश्न केला. हा प्रकार सोसायटीच्या प्रवेशद्वारात सुरू होता. या तरूणाचे घर सोसायटीच्या तळमजल्याला होते. त्यावेळी त्या तरूणाच्या घरातील कुटुंबीय यामध्ये चार ते पाच महिला आणि तीन तरूणांनी मराठी भाषेतून बोलत नाहीत म्हणून दोन्ही महिलांना सोसायटी आवारात बेदम मारहाण केली. यावेळी एका महिलेच्या कडेवर बाळ होते. या मारहाणीत त्या बाळाची आबाळ झाली. याची पर्वा मारहाण करणार्‍यांनी केली नाही. ’एक्सक्युज मी’ हा नेहमीच्या वापरातील शब्द आहे. त्यामुळे तो बोलला म्हणजे मराठी भाषेचा अपमान होत नाही. असे असताना किरकोळ कारण पुढे करून आम्ही दोन्ही महिलांना सात जणांनी बेदम मारहाण केली. 

Related Articles