अमेरिकेत विमान धावपट्टीवरून घसरून पाण्यात कोसळले   

ओरेगॉन : अमेरिकेत एक छोटे कॉर्पोरेट विमान धावपट्टीवरून घसरून पाण्यात कोसळले. सुदैवाने विमानातील प्रवाशी बचावले. सोमवारी दक्षिण ओरेगॉनमध्ये हा अपघात झाला, असे विमानतळ अधिकार्‍यांनी सांगितले. या अपघातात पाच जण जखमी झाले. विमानतळ प्रशासनाने सामाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे, की नैऋत्य ओरेगॉन विमानातील पायलट आणि चार प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. 
 
विमानतळाने व्यवस्थापनाने सांगितले की, विमानातील पायलट आणि चार प्रवाशांना वाचवण्यात त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सोमवारी संध्याकाळी दोन जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाकडून परवानगी मिळाल्यानंतर २०१९ होंडा एचए-४२० हे विमान पाण्यातून बाहेर काढण्यात आले. हे विमान सेंट जॉर्ज, युटाहून ओरेगॉनला येत होते.

Related Articles