कोळसा खाणीत गॅस गळती; सात कामगारांचा मृत्यू   

तेहरान : उत्तर इराणमधील कोळसा खाणीत गॅस गळतीमुळे सात कामगारांचा मृत्यू झाला. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने मंगळवारी वृत्त दिले. अपघातात ठार झालेले तीन कामगार हे अफगाणिस्तानमधील आहेत.राजधानी तेहरानच्या वायव्येला सुमारे २७० किलोमीटर अंतरावर दमघन शहराजवळ सोमवारी दुपारी हा अपघात झाला. अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
अहवालात म्हटले आहे, की प्रथमदर्शनी असे दिसून आले, की खाणीमध्ये सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. इराणमधील औद्योगिक अपघातात दरवर्षी सुमारे ७०० कामगारांचा मृत्यू होतो. गेल्या आठवड्यात, वायव्य इराणमधील लोखंडाच्या खाणीतील एका कामगाराचा कोसळून मृत्यू झाला. सप्टेंबरमध्ये, पूर्व इराणमधील कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात अनेक कामगार ठार झाले.
 

Related Articles