युरोपियन महासंघही २५ टक्के शुल्क लागू करणार   

अमेरिकेला इशारा; आज प्रस्तावावर मतदान 

लंडन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्काची घोषणा केल्यानंतर, युरोपियन महासंघाने देखील२५ टक्के प्रति-शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे. या प्रस्तावावर आज (बुधवारी) युरोपियन महासंघाच्या सदस्य देशांद्वारे मतदान केले जाईल. प्रस्ताव मान्य झाल्यास, हे दर १५ एप्रिलपासून लागू होतील. मे आणि डिसेंबरपासून बहुतेक शुल्क आकारले जातील.
 
युरोपियन आयोग अमेरिकन उत्पादनांना लक्ष्य केले असून, यातील काही नावे आश्चर्यकारक आहेत. ज्यामध्ये वस्तूंवर युरोपियन आयोगाने प्रत्युत्तर शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये हिरे, अंडी, डेंटल फ्लॉस, सॉस, पोल्ट्री, बदाम आणि सोयाबीन यांचा समावेश आहे. युरोपियन आयोग काही काळानंतर या सर्व गोष्टींवर शुल्क लादण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे बोर्बन, वाइन आणि दुग्धजन्य पदार्थ यादीतून काढून टाकण्यात आले आहेत. यामागील कारण म्हणजे ट्रम्प यांनी धमकी दिली होती, की जर युरोपियन युनियनने या वस्तूंवर शुल्क लावले तर अमेरिका युरोपियन वाईनवर २०० टक्के प्रति-शुल्क लावेल. हे विशेषतः फ्रान्स आणि इटलीसाठी चिंतेचे होते, ज्यांचे वाइन उद्योग अत्यंत मोठे आणि प्रभावशाली आहेत.

युद्ध २०१८ पासून 

२०१८ मध्ये जेव्हा ट्रम्प प्रशासनाने पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमच्या आयातीवर भारी शुल्क लादले तेव्हा व्यापार युद्ध सुरू झाले. प्रतिसादात, युरोपियन महासंघाने अमेरिकन व्हिस्कीसह अनेक उत्पादनांवर २५ टक्के प्रति-शुल्क लादले. त्यानंतर २०२१ मध्ये, जो बिडेन यांच्या कार्यकाळात काही दिलासा मिळाला आणि वाटाघाटीचा एक भाग म्हणून अमेरिकन व्हिस्कीवरील शुल्क निलंबित करण्यात आले. 
 

Related Articles