हा धार्मिक नव्हे, तर आर्थिक वाद   

तपासातून माहिती उघड 

पुणे : सलूनमध्ये काम करणार्‍या एका युवतीला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्तीने कलमा पढायला लावल्याच्या संशयातून भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सलून मालकास चांगलाच चोप दिला. मात्र, दोेघांच्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे कोथरूड पोलिसांनी केलेल्या तपासात माहिती उघड झाली आहे.कोथरूड भागात असणार्‍या जावेद नावाच्या सलून मालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्वला गौंड यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार चोप दिला. या सलूनमध्ये कामाला असलेल्या एक युवतीचे धर्मांतर करत असल्याचा आरोपावरून ही मारहाण करण्यात आली. 
 
पुढे त्याला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सलूनचालक आणि संबंधीत युवती या दोघांमध्ये अ‍ॅडव्हॉन्स घेतलेले पैसे पुन्हा मालकाला परत दिले नाहीत, यावरून त्यांच्यात वाद झाले होते. या युवतीला नोकरी सोडायची होती. मात्र, अ‍ॅडव्हान्स घेतलेले पैसे न देता निघून जात असलेल्या युवतीला सलून मालकाने शिविगाळ केली. त्यामुळे हा प्रकार धार्मिक नव्हे, तर आर्थिक वादातून घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Related Articles