लखनऊ : दिग्वेश राठीला सामनावीराचा किताब मिळाला. पण सामन्यानंतर कर्णधार रिषभ पंत आणि दिग्वेश दोघांनाही दंड ठोठवण्यात आला. मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी विजय मिळवल्यानंतरही लखनऊ संघाच्या दोन खेळाडूंना मोठा फटका बसला. सामन्यात संथ गोलंदाजीसाठी लखनऊचा कर्णधार रिषभ पंतला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कोणत्याही गोलंदाजी संघाला २० षटके पूर्ण करण्यासाठी ९० मिनिटे निश्चित केलेली वेळ असते. लखनऊ संघ निर्धारित वेळेपेक्षा एक षटक मागे होता. त्यामुळे त्याला शेवटच्या षटकात ३० यार्ड बाहेर एक खेळाडू कमी ठेवावा लागला. तसेच पंतला १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला. यंदाच्या हंगामात पंतकडून पहिल्यांदाच हा प्रकार घडल्याने त्याला १२ लाखांचा दंड करण्यात आला. याशिवाय आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल लखनऊचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीला सलग दुसर्यांदा दंड ठोठवण्यात आला. पंजाब किंग्जविरुद्ध बळी घेतल्यानंतर केलेल्या नोटबूक सेलिब्रेशनसाठी त्याला मानधनाच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागली होती. यावेळी नमन धीरला बाद केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा तेच केले. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा मानधनाच्या ५० टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली. तसेच सलग दुसर्यांदा असा प्रकार झाल्याने त्याच्या नावे नव्याने आणखी दोन डिमेरिट पॉइंट जोडले गेले.
Fans
Followers