E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दीनानाथ रुग्णालयास महापालिकेची जप्तीची नोटीस
Samruddhi Dhayagude
09 Apr 2025
पुणे : मिळकत कराची थकबाकी असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास पुणे महानगरपालिकेने मंगळवारी जप्तीची नोटीस पाठविली आहे. मिळकत कराचे २२ कोटी दोन दिवसांत जमा करा अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
गर्भवती महिलेच्या मृत्युमुळे पुणेकरांच्या संतापाला सामोरे जावे लागलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला आता महापालिकेने दणका दिला आहे. गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकतकर थकविल्या-प्रकरणी मंगेशकर रुग्णालयास नोटीस देण्यात आली आहे.
अशा प्रकारची नोटीस बजावली जाणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी नुकतेच सांगितले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा मिळकत कर थकविला असल्याचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी इशारा दिला होता.
एरंडवणा येथील मंगेशकर रुग्णालय हे लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनच्या मालकीचे आहे. या मिळकतीवर २०२४-२५ या आर्थिक वर्षाअखेर सुमारे २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ इतकी कर थकबाकी आहे. या मिळकतीवर आकारण्यात आलेली कर आकारणी मान्य नसल्याने फाऊंडेशनने २०१६-१७ मध्ये महापालिकेविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. या दाव्यात फाऊंडेशनला मिळकत करात समाविष्ट असलेली सामान्य कराची पन्नास टक्के रक्कम आणि इतर कर भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, २०१४ ते २०२५ या कालावधीतील फाउंडेशनकडे एकूण २२ कोटी ६ लाख ७६ हजार ८१ रुपये इतकी मिळकत कराची थकबाकी आहे.
तोंडी आदेश दिले
मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत सदर मिळकतीवर जप्तीची कारवाई करावी, असे तोंडी आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार काल मिळकत कर विभागाने फाउंडेशनला नोटीस बजावली आहे.
Related
Articles
सातारा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली
17 Apr 2025
काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसमुळेच : थोपटे
21 Apr 2025
चाकणमध्ये तोतापुरी कैर्यांची आवक
17 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
वाहन उद्योग वेगात
20 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
21 Apr 2025
सातारा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली
17 Apr 2025
काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसमुळेच : थोपटे
21 Apr 2025
चाकणमध्ये तोतापुरी कैर्यांची आवक
17 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
वाहन उद्योग वेगात
20 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
21 Apr 2025
सातारा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली
17 Apr 2025
काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसमुळेच : थोपटे
21 Apr 2025
चाकणमध्ये तोतापुरी कैर्यांची आवक
17 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
वाहन उद्योग वेगात
20 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
21 Apr 2025
सातारा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली
17 Apr 2025
काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसमुळेच : थोपटे
21 Apr 2025
चाकणमध्ये तोतापुरी कैर्यांची आवक
17 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
वाहन उद्योग वेगात
20 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
21 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!