तिरंगी मालिकेसाठी हरमनप्रीत कौरकडे भारताचे नेतृत्त्व   

मुंबई : भारतात अजूनही आयपीएल २०२५ चा थरार रंगला आहे. दरम्यान, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसोबत होणार्‍या तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, स्मृती मानधना उपकर्णधार आहे. 
 
संघाची घोषणा करताना बीसीसीआयने सांगितले की, रेणुका सिंग आणि तीतस साधूला दुखापत झाली आहेत. दोन्ही खेळाडू निवडीसाठी उपलब्ध नव्हते आणि म्हणूनच त्यांची निवड झाली नाही. भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील त्रिकोणी एकदिवसीय मालिका २७ एप्रिलपासून श्रीलंकेत सुरू होणार आहे. प्रत्येक संघ ४-४ सामने खेळेल म्हणजेच प्रत्येक संघासोबत २-२ सामने. भारताचा पहिला सामना २७ एप्रिल रोजी श्रीलंकेविरुद्ध होईल. 
 
यानंतर, दोन्ही संघ ४ मे रोजी दुसर्‍यांदा आमनेसामने येतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामने २९ एप्रिल आणि ७ मे रोजी खेळवले जातील. भारत आपले सर्व सामने कोलंबोमध्ये खेळेल.सर्व सामन्यांनंतर, ११ मे रोजी अव्वल २ संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. तिरंगी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, काशवी गौतम, स्नेहा राणा, अरुंधती रेड्डी, तेजल हसबनीस, श्री चरणी, शुची उपाध्याय. 
 आयसीसी महिला एकदिवसीय संघ क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघ तिसर्‍या क्रमांकावर आहे. संघाचे ११२ रेटिंग गुण आहेत. दक्षिण आफ्रिका १०३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ ८० रेटिंग गुणांसह क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे.
 

Related Articles