E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक ,संपादकीय
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
Samruddhi Dhayagude
09 Apr 2025
ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे
शिक्षणाची गुणवत्ता ढासळत असल्याचे गेले काही वर्ष सातत्याने बोलले जात आहे. असरचा अहवाल आला की, त्यासंदर्भाने सातत्याने माध्यमांमधून त्यावर प्रकाशझोत टाकला जातो. त्याचबरोबर विविध सरकारी अहवालही त्यासंदर्भाने बरेच काही सांगत आहेत. राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात देखील शिक्षणाच्या गुणवत्तेवर चर्चा घडली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण धोरणातही त्यासंदर्भातील कच्च्या दुव्यांवर चर्चा करण्यात आली आहे. अर्थात गेल्या काही वर्षाचा इतिहास पाहिला, तर शिक्षण गुणवत्तापूर्ण आहे असे कधीच नमूद केलेले अहवाल दिसत नाही.
स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत आलेल्या विविध अहवालांवर नजर टाकली, तर हरवलेली गुणवत्ता हेच चित्र आहे. त्यावर तात्कालिक उपाययोजना देखील केल्या जातात. सरकार धोरणही घेते; मात्र शिक्षणाची गुणवत्ता केवळ एका घटकावर अवलंबून नाही. शिक्षणाच्या गुणवत्तेवर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध घटकांचा परिस्थितीचा परिणाम होत असतो. त्यामुळे जोवर परिणाम करणार्या सर्वच घटकांमध्ये बदल घडून येत नाही, तोवर गुणवत्तेचा आलेख काही प्रमाणात घसरलेला दिसत राहणार यात शंका नाही. यातील सर्वच घटकांमध्ये बदल करणे हे शिक्षण व्यवस्थेच्या हाती असले तरी सुधारण्यासाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागणार आहे; मात्र जे शिक्षणाच्या हाती आहे त्या गोष्टी करणे शक्य आहे. त्या दृष्टीने राज्य अभ्यासक्रम आराखड्यात विविध घटकांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यात अध्यापन परिणामकारक करण्याबाबत सूचित केले आहे. तो पर्याय अधिक महत्त्वाचा आहे हे खरेच; पण त्यामुळे शंभर टक्के गुणवत्ता साधली जाईल हेही खरे नाही. शिक्षणात परिवर्तनासाठी एकाचवेळी पाऊलवाटा चालण्याची गरज आहे.
अध्यापन कौशल्य
अनेकदा विद्यार्थी शाळा सोडण्याची देखील जी अनेक कारणे नमूद केली जातात, त्यात शिक्षकांचे अध्यापन हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. शिक्षणाची गुणवत्ता शिक्षकांच्या अध्यापनावर अवलंबून असते असे मानले जाते. त्याचे आशय ज्ञान जितके महत्त्वाचे मानले जाते, तितकेच अध्यापनाचे कौशल्य देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे अध्यापनशास्त्र प्रभावी व सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी अनेक घटकांचा विचार करावा लागतो. त्यात प्रामुख्याने आदर आणि काळजी सुनिश्चित करण्याची भूमिकादेखील महत्त्वाची ठरते. त्यामुळे शाळेमध्ये जिथे मुलांना सुरक्षित वाटते अशा वातावरणाची गरज व्यक्त करण्यात आली आहे. नातेसंबंधामध्ये काळजी असायला हवी. समतेचा विचार आवश्यक आहेच आणि त्याचवेळी आदर देणे देखील महत्त्वाचा आहे. धर्म, जात, लिंग, श्रद्धा, समुदाय, दिव्यांगत्व किंवा इतर कोणत्याही घटकांवर आधारित कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. वर्गात शिक्षकाने जर अध्यापनाची प्रक्रिया करताना कोणत्याही कारणाने विद्यार्थ्यांमध्ये भेदाभेद केला, तर विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे शिक्षकाने समतेच्या दृष्टीने वर्गात वर्तन करण्याची गरज आहे. तसा विचारही अनेक विचारवंतांनी नमूद केला आहे.
वर्गात अध्यापन करत असताना वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी समान प्रवेश आणि संधी मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये विषमता असली तरी सर्व विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये आणि शालेय प्रक्रियांमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्नांची गरज आहे, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग घेता येईल अशी संधी दिली जाईल अशा उपक्रमांचा विचार केला जायला हवा. वर्गात अनेकदा केवळ यशस्वी होणार्या विद्यार्थ्यांना सर्व ठिकाणी संधी देण्याचा विचार केला जातो. त्यामुळे असा भेद करणे अपेक्षित नाही. केवळ यशाची सर्वोत्तम शक्यता असलेल्यांनाच सहभागी होता येईल असे घडणार नाही हा विचार देखील महत्त्वाचा आहे. शाळांनी प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता आणि शाळेबद्दल आवड वाढवणारे वातावरण निर्माण करण्याची अपेक्षा सातत्याने व्यक्त करण्यात आली आहे. शाळांमध्ये सर्वांनी एकमेकांना समजून घेऊन एकमेकांची काळजी घेणे हा विचार केंद्रस्थानी असावा, ही भूमिका देखील महत्त्वाची आहे. खरेतर शाळा अथवा घरात काळजी घेणे ही लोकांबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल विचार करण्याची आणि जबाबदारीची वृत्ती आहे. विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती, आदर हा विचार काळजी घेण्याच्या केंद्रस्थानी असायला हवा.
मुळात शिक्षणाचा विचार करताना केवळ आशय पोहचवण्याचा विचार महत्त्वाचा नाही, तर मानवी जीवनात मूल्यांचा विचार पेरला जाणे गरजेचा आहे. त्यामुळे जीवन उन्नत बनवणारी मूल्ये वृद्धिंगत व्हावीत यासाठी नियमितपणे या सर्व प्रशिक्षणाची गरज आहे. त्या दृष्टीने शिक्षणात किती प्रयत्न होतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. वसतिगृहांमध्ये समावेशकतेच्या दृष्टीने आरोग्य व सुरक्षेसाठी सुविधांची खात्री करण्याची गरज आहे. शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नांचे समूळ निर्मूलन करण्यासाठी या सुविधांचा प्रभावी वापर करायला हवा. आज शाळाबाह्य मुलांचा विचार केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या सुमारे पाच कोटी नमूद केली आहे. ही संख्या चिंताजनक आहे. त्या दृष्टीने शिक्षण व्यवस्थेत काय प्रयत्न केले जातात याचाही विचार करायला हवा.
सकारात्मक संबंध हवेत
एकीकडे शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने विचार करत असताना, शिक्षक-विद्यार्थी यांच्यात सकारात्मक संबंध निर्माण करण्यावर भर देण्याची गरज आहे. शाळा म्हणून मानवी संबंधाचा विचार केला जात असतो. शिक्षणातून संस्कार पेरणीची जी अपेक्षा आहे. त्यामुळे येथे असणारे शिक्षक आणि विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, व्यवस्थापन, प्रशासन, संस्थाचालक अशी कितीतरी माणसे विविध स्वरूपात कार्यरत असतात. त्यामुळे त्या सर्वांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध येत असतो. त्यामुळे तेथे मानवी संबंधाचा सकारात्मक संबंधाचा विचार अधिक महत्त्वाचा आहे. यांच्यातील सकारात्मक संबंध बोधात्मक आणि सामाजिक-भावनिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असतात. असे सकारात्मक नाते निर्माण करण्यास काही महत्त्वाच्या मार्गाचा विचार शाळा, विद्यालय स्तरावर करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकरीत्या जाणून घेण्याची गरज असते. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे शिकण्याचे वैयक्तिक अनुभव समजून घेण्यास आणि त्यांचे नियोजन करण्यास मदत होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे बोलणे काळजीपूर्वक ऐकायला हवे. आपण जेव्हा विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा त्यातून त्यांना केवळ गृहीत न धरता त्यांचा माणूस म्हणून विचार करत असतो हे दृढ होण्यास मदत होते. त्या वर्तनामुळे काळजी आणि आदर व्यक्त होतो, विश्वास वाढतो. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत होत असते. विद्यार्थ्यांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. यामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कसे विचार करतात, तर्क करतात आणि प्रतिसाद देतात हे शोधण्यास मदत होते. जे अध्ययन-अध्यापनाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. मुळात शिक्षणात प्रोत्साहन, स्वीकार या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना नेहमी गृहीत धरले जाणे योग्य नसते. ते कितीही लहान असले तरी, त्यांना काय कळते असे घडत नाही. ते देखील व्यक्तीसारखेच संपूर्ण व्यक्तीमत्व आहे हे लक्षात घ्यायला हवे.
प्रश्न विचारण्याचे कौशल्य
शाळांमधील चित्र आपल्याला खरोखर बदलायचे असेल, गुणवत्तेची वाट चालायची असेल, व्यक्तिमत्वाला आकार द्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. प्रश्न विचारण्याचे कौशल्य विकसित झाले, तर विद्यार्थ्यांचा संबंध माहितीपेक्षा ज्ञानाशी नाते जोडले जाण्याची शक्यता अधिक आहे. विद्यार्थी मार्कापेक्षा गुणांशी जोडले जातील. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विचारलेले आणि शिक्षकांनी विद्यार्थ्याला विचारलेले प्रश्न, विद्यार्थ्यांना उत्तरे देताना विशिष्ट विषयाचा सखोल विचार करण्यास मदत करत असतात. विद्यार्थ्यांच्या भावना, मनःस्थिती ओळखणे आणि त्यांना प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना स्थिर होण्यास, अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास, त्यांच्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास व इतरांच्या भावना समजून घेण्यास आणि त्यांना प्रतिसाद देण्यास मदत होत असते. शिक्षणात समजून घेण्याची प्रक्रिया जितकी प्रभावी आणि परिणामकारक होईल तितक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या गुणवत्तेची वाट चालणे घडेल हे लक्षात घ्यायला हवे. हळूवारपणे प्रतिसाद देण्याचा विचार अलीकडे केला जाऊ लागला आहे. जर एखादा विद्यार्थी वर्गात अयोग्य वर्तन करीत असेल, तर अशा वर्तणुकीचे कारण काय असू शकते हे समजून घेण्यासाठी शिक्षकांकडे सौम्यपणे, सहानुभूतीने एकमेकांशी संवाद साधून ते हाताळण्यासाठी अनेक धोरणे असली पाहिजेत.
आपल्याला शिक्षणात किती प्रमाणात सहयोग प्रदान करण्याचा विचार केला जात आहे. विद्यार्थ्यांना अनुभवी विद्यार्थी किंवा प्रौढांकडून पद्धतशीर आधार दिला जातो तेव्हा विद्यार्थी सहजपणे नवीन ज्ञान आत्मसात करण्याच्या प्रक्रियेत अधिक सक्रियता दर्शित करत असतात. विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता विद्यार्थ्यांना नेहमीच आव्हाने स्वीकारण्यास आवडत असते. त्यामुळे त्यांना नवीन ज्ञान एक आव्हान वाटेल असे असले पाहिजे. त्यादृष्टीने विचार करताना हा देखील विचार करायला हवा की, आपण विद्यार्थ्यांना जे आव्हान देत आहोत ते त्यांचे अनुभव विश्व, वयोगट, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती लक्षात द्यायला हवे. त्यामुळे ते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर नाही ना याची काळजी घ्यायला हवी. ते त्यांच्या वर्तमान ज्ञानाशी संबंधित असावे आणि अनुभवी व्यक्तीच्या पाठिंब्याने केले जाण्याचा विचार करायला हवा. विविध सूचनांचा वापर करत शिक्षकांनी वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या कल व गरजेनुसार आशय, अध्यापन पद्धती, अध्यापन साहित्य व मूल्यांकन पद्धतीची निवड करायला हवी. त्या दृष्टीने सध्याच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्य आहे. ते शिक्षकांनी उपभोगण्याची गरज आहे, तसेच मोठी पटसंख्या असलेल्या वर्गात समान आवडी असलेल्या विद्यार्थ्यांचे छोटे गट करणे, विद्यार्थ्यांना योग्य काम, सवयी आणि जबाबदारी विकसित करण्यास मदत करणे, कृतीदरम्यान योग्य सवयी विकसित करणे, जबाबदारी घेणे हे शिकण्यासाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये विद्यार्थी, जागा आणि साहित्य वापरण्यापूर्वी आणि नंतर व्यवस्थित ठेवणे, कृतींसाठी वेळ सुनिश्चित करणे, कामांची जबाबदारी घेणे, काम पूर्ण करण्यासाठी पुढे जाणे, शिक्षकांच्या उपस्थितीशिवायही दिलेले काम करत राहणे आणि विद्यार्थ्यांना वाटपाशिवाय काम करण्याची परवानगी देणे यांसारख्या पैलूंचा विचार करण्याची गरज आहे. मुळात या दिशेने प्रवास केला, तर गुणवत्तेसाठी काहीसा वेळ लागेल; मात्र यातून होणारी पेरणी गुणवतेच्या दिशेने प्रवास घडवणारी असेल.
एका अर्थाने हा प्रवास मूल्यमापनाच्या दिशेने जाणारा आहे. सध्याच्या मूल्यमापन प्रक्रियेत आकारिक मूल्यमापनाच्या साधनांचे उपयोजन करण्यामागे जो विचार आहे, त्यात मूल्यमापनापेक्षा विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक परिणामकारक करण्याबाबत अपेक्षा आहे. त्यामुळे विविध मार्गांचा विचार करायला हवा. त्याचवेळी परिस्थिती पाहून त्याची निवड करण्याची आवश्यकता आहे. सब घोडे बारा टक्के न्यायाने शिक्षणातील प्रवास धोकादायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे विविधतेचा विचार करून दिशा निश्चित केली गेली, तर भविष्याची पावले अधिक समृद्धतेने चालणे घडेल. त्यामुळे त्या दिशेने प्रवास घडावा यासाठी प्रशिक्षण सेवापूर्व किंवा सेवातंर्गत प्रशिक्षणाचा विचार केला जाण्याची गरज आहे.
Related
Articles
रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्यास परवाना रद्द होणार
16 Apr 2025
कोयता गँगवर ‘मकोका’
22 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
धनकड यांचा थयथयाट (अग्रलेख)
19 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
एर्दोगान यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान!
20 Apr 2025
रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्यास परवाना रद्द होणार
16 Apr 2025
कोयता गँगवर ‘मकोका’
22 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
धनकड यांचा थयथयाट (अग्रलेख)
19 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
एर्दोगान यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान!
20 Apr 2025
रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्यास परवाना रद्द होणार
16 Apr 2025
कोयता गँगवर ‘मकोका’
22 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
धनकड यांचा थयथयाट (अग्रलेख)
19 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
एर्दोगान यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान!
20 Apr 2025
रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्यास परवाना रद्द होणार
16 Apr 2025
कोयता गँगवर ‘मकोका’
22 Apr 2025
वाचक लिहितात
16 Apr 2025
धनकड यांचा थयथयाट (अग्रलेख)
19 Apr 2025
संजू सॅमसन दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर?
22 Apr 2025
एर्दोगान यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान!
20 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!