व्हॉट्सऍप कट्टा   

खरा भक्त
 
एक श्रीमंत व्यापारी आपल्या जीवनातील अडचणींवर उपाय मिळावा म्हणून दररोज मंदिरात जाऊन महागडी पूजा आणि द्रव्य अर्पण करत असे. त्याला वाटत होते की, ईश्वराला संपत्तीच्या माध्यमातून प्रसन्न करता येईल आणि त्याच्या समस्यांचे निराकरण होईल. मात्र, बराच काळ उलटून गेला तरी त्याच्या अडचणी कमी झाल्या नाहीत.
 
एके दिवशी, मंदिरात त्याने एक साधा गरीब माणूस पाहिला, जो जुनाट कपड्यांमध्ये शांतपणे ईश्वरापुढे हात जोडून उभा होता. तो आनंदाने म्हणत होता, हे प्रभु! तुझे शतशः आभार! तुझ्या कृपेने मी समाधानाने झोपतो, माझ्या आयुष्यात कोणतीही भीती नाही, कसलीच तक्रार नाही. माझ्यावर सदैव अशीच कृपा राहू दे.
हे ऐकून व्यापारी चकित झाला. तो मनात विचार करू लागला - मी इतक्या मोठ्या अर्पणांनंतरही दुःखी आहे आणि हा गरीब काहीही न देता इतका आनंदी कसा?
 
याचा उलगडा करण्यासाठी तो एका ज्ञानी संतांकडे गेला आणि संपूर्ण कथा सांगितली. संत शांतपणे हसले आणि म्हणाले, सेठजी, तुम्ही ईश्वराला व्यवहाराच्या दृष्टीने पाहत आहात. जसे तुम्ही लोकांना संपत्तीने प्रसन्न करता तसेच देवालाही प्रसन्न करायला पाहत आहात. पण तो गरीब माणूस ईश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो. तो काहीही अपेक्षा न ठेवता त्याचे आभार मानतो. खरी भक्ती ही निरपेक्ष प्रेम आणि समाधानात असते. ज्या दिवशी तुम्ही अपेक्षेशिवाय ईश्वरावर श्रद्धा ठेवाल, त्यादिवशी तुम्हालाही खरा आनंद आणि शांती लाभेल.
तात्पर्य : ईश्वराची भक्ती स्वार्थविरहित आणि निरपेक्ष असावी, तेव्हाच खरी सुख-शांती प्राप्त होते.
---
आपल्या जुनाट विचारांचा बदल करणे आणि सकारात्मक विचार मनात ठेवणे हाच जीवनाकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन असतो. बदल हा जीवनाचा आवश्यक भाग आहे आणि तो स्वीकारल्याशिवाय प्रगती शक्य नाही. जुन्या रूढी, चुकीच्या समजुती आणि नकारात्मक विचारांना दूर करून, नवे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कोणत्याही अडचणींवर मात करता येते आणि जीवन अधिक आशादायी व यशस्वी बनते. त्यामुळे नेहमी बदलांना सामोरे जा, नवे विचार स्वीकारा आणि सकारात्मकतेने जीवन जगा.
---
बायको : तुम्हाला काय वाटतं
मी तुमच्याशी भांडण्यासाठी कारणं शोधते?
नवरा : अरे! नाही! नाही!
तू कारणं शोधतेस असं कोणी सांगितलं?
तू तर मला शोधतेस, कारणं तर तुझ्याकडे लाखो आहेत.
----
खरा शिष्य कोण?
एकदा दोन तरुण स्वामी विवेकानंदाकडे गेले. त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते. तसे त्यांनी स्वामीजींना सांगितले. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्त बसले. दुसरे दिवशी तोच प्रकार - कंटाळले - पण एकजन स्वामीजींची रोज पूजा करे तर दुसरा त्यांना दोष देई, तुमच्यात माणुसकी नाही तुम्ही कठोर आहात वगैरे. पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहोत. एक जण रोज पूजा करी दुसरा दोष देई. एक दिवस नदीला पूर आला पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा -स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दोष देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला. असे तीन दिवस चालले. चौथ्या दिवशी पुर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देणार्‍याला शिष्य म्हणून स्वीकारले. ते म्हणाले, शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो. निष्ठा हवी. तामसी वृत्ती बदलता येईल. पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल.
तात्पर्य : कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे.
---
मॅडम बंड्या, तू लिहलेली दहाच्या दहा उत्तरं चुकीची आहेत.
बंड्या : नाही मॅडम, माझं फक्त एकच उत्तर चुकलय.
मॅडम : मूर्खा, तुझी वही परत बघ.
बंड्या : मॅडम, यातली पाच उत्तर पप्पांची आहेत, चार मम्मीची आहेत. माझं फक्त एकच उत्तर आहे.
 

Related Articles