अमेरिकेविरोधात ब्राझिलने उपसले व्हिसाचे अस्त्र   

ऑस्ट्रेलिया, कॅनडाच्या नागरिकांनाही व्हिसा बंधनकारक

साओ पाउलो : अमेरिकेच्या विरोधात आता ब्राझिलने व्हिसाचे अस्त्र उपसले आहे. केवळ अमेरिकाच नव्हे तर ऑस्ट्रेलिया, कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा बंधनकारक केला आहे. ब्राझिलवर १० टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच केली. त्यानंतर हा निर्णय ब्राझिलने घेतल्याचे मानले जात आहे. 
 
गेल्या सहा वर्षांपासून अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना ब्राझिलमध्ये व्हिसा शिवाय प्रवेश दिला जात होता. आता तो नियम बदलत असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. ब्राझिलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात. २०१९ मध्ये दोन्ही देशांनी संबध दृढ करण्यासाठीं नागरिकांना मुक्त प्रवेश देण्यासाठी व्हिसाची अट काढून टाकली होती. ब्राझिलमध्ये मार्च २०२३ मध्ये सत्तांतर झाले. यानंतर अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी तिन्ही देशांच्या नागरिकांना व्हिसा आवश्यक असल्याचा नियम केला. या संदर्भातील विधेयकावर तीन वेळा चर्चा झाली. पण, कायद्यात रुपांतर करण्याचे लांबणीवर पडले. अमेरिकेने ब्राझिलवर १० टक्के प्रत्युत्तर कर लागू करण्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली. त्यामुळे अमेरिकेसह कॅनडा, ऑस्ट्रेलियाच्या नागरिकाना व्हिसा आवश्यक असल्याचा नियम केला आहे. या संदर्भातील विधेयकावर लवकरच सिनेटमध्ये मतदान घेतले जाणार आहे.  
 

Related Articles