माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपमध्ये प्रवेश   

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी मुंबईत महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. केदार जाधवने गेल्या वर्षी जूनमध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर आता राजकारणात पुढील वाटचाल करणार आहेत.मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात केदार जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.मुंबईत महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पक्षाचा बिल्ला लावून भाजपचे सदस्यत्व दिले.
 
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव म्हणाले, २०१४ पासून केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून त्यांना ज्या प्रकारची प्रसिद्धी आणि पाठिंबा मिळाला आहे.पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ती मला खूप प्रेरणादायी वाटते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपसाठी माझ्याकडून जे काही छोटे-मोठे योगदान देता येईल ते करणे हे माझे ध्येय आहे. मला पूर्ण विश्वास आहे की मला जी जबाबदारी मिळेल ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन.
 
केदार जाधवने गेल्या वर्षी जूनमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. समाजमाध्यमांद्वारे त्याने ही माहिती दिली.न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात ८ फेब्रुवारी २०२० रोजी भारतासाठी केदार जाधवने शेवटचा सामना घेळला आणि ३९ व्य वर्षी निवृत्ती घोषित केली. चार एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने केवळ ३५ धावा केल्या. या मालिकेत त्याला दोन सामन्यांमध्ये प्लेइंग ११ चा भाग बनवण्यात आले.
 
केदार जाधवचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
 
केदार जाधवने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने १६ नोव्हेंबर २०१४ रोजी रांची येथे श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. ७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये जाधवने ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या. या काळात त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली. जाधवनेही २७ बळी घेतले. आंतरराष्ट्रीय T२० बद्दल बोलायचे तर जाधवने नऊ सामन्यात १२३.२३ च्या स्ट्राईक रेटने ५८ धावा केल्या.
 
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादमधील केदारची मी खेळी 
 
भारतीय संघाव्यतिरिक्त, केदार दीर्घकाळ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादचेही प्रतिनिधित्व केले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली केदार जाधवने चमकदार कामगिरी केली. आयपीएल मध्ये ९५ सामन्यात १२३.१७ च्या स्ट्राईक रेटने ११९६ धावा केल्या. त्याने चार अर्धशतकी खेळी खेळल्या.

Related Articles