गोव्यात बेकायदा राहणार्‍या रशियन नागरिकांना अटक   

ज्येष्ठ महिलेसह मुलाचा समावेश 

पणजी : गोव्यात बेकायदा राहणार्‍या रशियन नागरिकाला त्याच्या आईसह पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. महिला ७५ वर्षांची असून ती मुलासह व्हिसाशिवाय राहात असल्याचे तपासात उघड झाले होते. गोवा पोलिसांचे प्रवक्त्याने सांगितले की, ब्लिझनेत्सोवा लिउडमिला आणि तिचा मुलगा आंद्रेई ब्लिझनेत्सोव्ह उत्तर गोव्यातील दांडोच्या सिओलिम गावात बेकायदा राहात होते. या प्रकरणी नुकताच गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्याकडे व्हिसा नव्हता त्यामुळे त्यांच्याविरोधात परदेशी नागरिक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. व्हिसाची मुदत संपूनही ते राहात असल्याचे तपासात उघड झाले होते. 

Related Articles