चाळकवाडी टोलनाक्यावर स्थानिकांकडूनही वसुली   

बेल्हे, (वार्ताहर) : पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी (ता. जुन्नर) या टोलनाक्यावर स्थानिक नागरिकांना टोल सवलत असतानासुद्धा टोल प्रशासनाकडून टोलवसुली केली जात असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.चाळकवाडी टोलनाक्यावर छोट्या वाहनांना एकशे वीस रुपये टोल आकारला जात होता.१ एप्रिलपासून या टोलमध्ये पंधरा रुपयांची टोलवाढ वाढ करण्यात आली आहे. स्थानिकांना सवलत देण्याची मागणी होत असताना वसुली केली जात आहे.
 
या टोलवर स्थानिक नागरिकांना आधारकार्ड दाखवून टोल सवलत दिली जात होती. टोल वसुलीवरुन स्थानिक नागरिकांबरोबर अनेकवेळा वादविवाद झाले आहेत. हे वादविवाद टाळण्यासाठी टोल प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांना पास पद्धत सुरू न करण्याचा टोल प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला. त्यानंतर टोलप्रशासनाकडून दोनशे रुपये व गाडीचे कागदपत्रे घेऊन एक वर्षासाठी पास दिला जाईल, असे सांगून सुमारे ३ हजाराहून अधिक लोकांकडून प्रत्येकी दोनशे रुपये आधारकार्ड व गाडीची कागदपत्रे देण्यात आली एव्हढेच नाही तर ज्यांच्याकडे फास्टॅग नाही त्यांना फास्टॅग काढण्यास सांगण्यात आले त्याप्रमाणे स्थानिक नागरिकांनी पण फास्टॅग काढले. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारचा पास देण्यात आलेला नाही. याउलट तुमच्या फास्टॅगवरुन शुन्य रुपये टोल कापला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र काही स्थानिक नागरीकांच्या फास्टॅग मधून टोल कापला जात आहे जर हे सॉफ्टवेअर अपडेट असेल तर पैसे कसे कापले जातात? याबाबत अनेक स्थानिक नागरिकांच्या तक्रारी केल्या आहेत.
 
स्थानिक दोनशे रुपये घेऊन त्याची कुठलेही पावती दिली जात नसल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. फास्टॅगमधून कापले गेलेले पैसे परत मागण्यासाठी गेले असता नॅशनल हायवेकडून पैसे घ्या अशी टोलवाटोलवी करुन उद्धटपणे उत्तरे दिली जातात स्थानिक नागरिकांना टोल फ्री असतानाही दोनशे रुपये कसे काय घेतले जातात असा प्रश्न स्थानिक नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. चाळकवाडी टोलनाक्यावर एक एप्रिलपासून टोलवाढ करण्यात आली आहे टोल कापल्यानंतर कुठल्याही प्रकारची पावती दिली जात नसल्यामुळे वाहनांना नक्की किती टोल आहे, याबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ही स्थानिक वाहनधारकांची फसवणूक

स्थानिक नागरिकांना पास देणार असल्याचे सांगण्यात आले होत, त्यासाठी लागणारी कागदपत्रे व दोनशे रुपये देण्यात आले होते. असे असतानाही माझ्या गाडीला टोल आकरणी केली जात आहे. ही स्थानिक वाहनधारकांची फसवणूक आहे, असे स्थानिक ग्रामस्थ अशोक नेहरकर यांचे म्हणणे आहे.टोलनाक्याजवळ माझे घर असून, माझेही टोलचे पैसे कापले गेले आहेत. ऐवढेच नाहीतर माझ्या घराजवळ असलेल्या एका हॉटेल व्यवसायिकाचाही तीन वेळा टोल घेण्यात आला आहे, अशी तक्रार स्थानिक ग्रामस्थ संपत सोनवणे यांनी केली.

मशिनमध्ये तांत्रिक अडचण

फास्टॅगच्या व स्वयंचलित मशिनच्या तांत्रिक अडचणीमुळे हा टोल कापला जात आहे. त्याबाबत लवकरच दुरुस्ती करुन स्थानिक नागरिकांना दिलास देऊ, असे टोलनाका व्यवस्थापक दत्तात्रेय वामन यांनी सांगितले.
 

Related Articles