महिलेच्या आकस्मिक मृत्यूनंतर विमान तातडीने उतरवले   

छत्रपती संभाजीनगर : इंडिगोच्या विमानात एका प्रवासी महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर विमान तातडीने उतरविण्यात आले.  
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या रहिवासी असलेल्या सुशीला देवी (वय ८९) मुंबई ते वाराणसी जाणार्‍या इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होत्या. मात्र, विमान हवेत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काही वेळाने या महिलेचा विमानात मृत्यू झाला. यानंतर छत्रपती संभाजीनगर  येथील चिकलठाणा विमानतळावर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हे विमान तातडीने उतरविण्यात आले. 
 
लँडिंगनंतर एका वैद्यकीय पथकाने या प्रवासी महिलेची तपासणी करून तिला मृत घोषित केले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याने आवश्यक औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर विमानाने वाराणसीसाठी उड्डाण केले. दरम्यान, या महिलेचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
 

Related Articles