अभिनेते संदीप पाठक यांना राम नगरकर कलागौरव पुरस्कार   

पुणे : ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राम नगरकर कला अकादमीतर्फे देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांना जाहीर झाला आहे,अशी माहिती राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांनी दिली.राम नगरकर कलागौरव पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. त्यासाठी प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल.
 
या आधी विनोदी अभिनेते भाऊ कदम, निलेश साबळे, समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांना राम नगरकर कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या  उत्तरार्धात सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे पाठक यांची प्रकट मुलाखत घेतील. या दरम्यान संदीप पाठक ‘वर्‍हाड निघालय लंडनला’ या नाटकातील काही भाग सादर करतील.

Related Articles