प्रश्नांच्या सरबत्तीनंतर मंगेशकर रूग्णालय निरूत्तर   

डॉ. धनंजय केळकर पत्रकार परिषदेतून उठून गेले 

पुणे : गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी प्रसार माध्यमांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र रूग्णालय प्रशासनाकडे एकाही प्रश्नाचे उत्तर नसल्याने ते निरूत्तर झाले. रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. धनंजय केळकर हे आर्ध्या पत्रकार परिषदेतून उठून गेले. 
 
महिलेल्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाची बदनामी होती आहे. त्यामुळे रूग्णालयाची बाजू मांडण्यासाठी डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषेद बोलविली होती. मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देता येत नसल्याने डॉ. केळकर हे पत्रकार परिषदेतून उठून गेले. यावेळी डॉ. समीर जोग, डॉ. माधव भट्ट, डॉ. उतक्रांत कुर्लेकर, डॉ. सचिन व्यवहारे आदी उपस्थित होते. 
 
भिसे कुटुंबियांना अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते का? डॉक्टर अशा पद्धतीने अनामत रक्कम भरण्यास सांगू शकतात का? या प्रकरणी डॉ. सुश्रूत घैसास यांची रूग्णालय प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली होती का? संबंधित महिला ५ तास ३० मिनीटे रूग्णलयात असताना महिलेच्या नातेवाईकांनी परस्पर रूग्ण दुसर्‍या रूग्णालयात नेला असे खोटे सांगण्यात आले. समाजाची दिशाभुल करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतरही संबंधित महिलेला उपचारासाठी का दाखल करून घेण्यात आले नाही? असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र यातील एकाही प्रश्नांचे उत्तर डॉ. धनंजय केळकर व उपस्थित डॉक्टरांना देता आले नाहीत. शेवटी डॉ. धनंजय केळकर व सहकारी डॉक्टर पत्रकार परिषदेतून उठून गेले. 
 
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम मागत नाहीत. कारण तशी पद्धतच आमच्याकडे नाही. रुग्णालयाकडून खर्चाचे अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिले जाते. त्यावरही अनामत रक्कम लिहायची पद्धतच नाही. त्यादिवशी कोणत्या कारणाने राहू-केतू काय डोक्यामध्ये आला, डॉ. घैसास यांनी चौकोनात १० लाख अनामत रक्कम लिहिली, ही गोष्ट खरी आहे. तुम्ही रूग्णालयातील कोणालाही विचारू शकता, डॉक्टरांकडून अनामत रक्कम मागितली जात नाही. आजवर मी अगणित शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आतापर्यंत कोणालाही असे लिहून दिले नाही, असे डॉ. धनंजय केळकर यांनी स्पष्टीकरण दिले.
 
अनामत रक्कम घेण्याचे धोरण लहान रक्कमांसाठी नव्हते. ५ ते १० लाखांच्या रकमांकरिता हे धोरण होते. पण गेल्या चार पाच दिवसांपूर्वी हे धोरण बंद करण्यात आले आहे. गरीब रुग्णांकडून अनामत रक्कम घेतली जात नव्हती. रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांवर कामाचा अतिताण असल्याने जी संवेदनशीलता किंवा माधुर्य पाहिजे ते कधीकधी कमी होते. ती सुधारण्यासाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. महापालिकेचा एकही रुपयाचा कर रूग्णालयाने थकविलेला नाही. जो काही कर आहे तो न्यायालयात भरला जातो. कर आकारणीची प्रथा कर्मिशिअल केली, त्याविरोधात आम्ही न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आम्ही न्यायालयात कर भरतो. असेही डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले. 
 

Related Articles