हाँगकाँगमधील सहा चिनी अधिकार्‍यांवर निर्बंध   

हाँगकाँग : हाँगकाँगच्या स्वायत्ततेला धोका निर्माण करणार्‍या चीनच्या सहा आणि हाँगकाँगच्या एका अधिकार्‍यावर अमेरिकेने निर्बंध लागू केले आहेत. या कारवाईनंतर अमेरिकेला  जशास तसे उत्तर देण्याचे चीनने ठरविले आहे.
 
न्याय सचिव पॉल लॅम, सुरक्षा कार्यालयाचे संचालक डाँग जिंगवेई, आणि पालिस आयुक्त रेमंड सियू यांचा समावेश आहे. निर्बंध लागू केल्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये वादाला तोंड फुटले आहे.  दोन्ही देशांत अगोदरपासूनच तैवान, आयात शुल्क विषयांवरून तणाव वाढला असताना नव्या वादाला तोंड फुटले आहे. चीन आणि हाँगकांगच्या अधिकार्‍यांचा वापर सुरक्षेसाठी हाँगकाँग सरकारकडून केला जातो. देशविरोधी कारवायात सहभाग असल्याचे दिसून येताच यापूर्वी १९ जणांची हकालपट्टी केली होती. त्यात अमेरिकन नागरिक आणि अन्य चार रहिवाशांचा समावेश होता, असे अमेरिकेच्या गृह विभागाने स्पष्ट केले.

Related Articles