दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका   

दंगल प्रकरणी चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : दिल्लीचे कायदा मंत्री कपिल मिश्रा यांना येथील न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. २०२० मधील दंगल प्रकरणी मिश्रा आणि इतरांविरुद्ध चौकशीचे आदेश न्यायालयाने मंगळवारी दिले.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव चौरसिया यांनी हा गुन्हा ’प्रथमदर्शनी’ दखलपात्र असल्याचे मानले आणि पुढील तपासाची आवश्यकता असल्याचे सांगितले. 
 
२०२० च्या ईशान्य दिल्लीतील जातीय दंगलीसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे असे दिसून येते की मिश्रा कर्दमपुरी परिसरात उपस्थित होते. हा एक दखलपात्र गुन्हा घडला आहे. याची चौकशी आवश्यक आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. मिश्रा सध्या दिल्लीतील करावल नगर मतदारसंघातील आमदार आहेत. दिल्लीच्या भाजप सरकारमध्ये ते कायदा आणि रोजगारासह अनेक महत्त्वाची मंत्रालये सांभाळत आहेत. दंगलीप्रकरणी मिश्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचा अर्ज  यमुना विहार रहिवासी महमद इलियास यांनी दाखल केला होता. 

Related Articles