आता केवळ सहा जिल्ह्यांत उरले नक्षलवादी : शहा   

नवी दिल्ली : नक्षलवाद मुक्त भारताचे स्वप्न करण्याच्या दिशेने सरकारने पावले टाकली आहेत. त्यात मोठे यशही प्राप्त केले आहे. नक्षलप्रभावित जिल्ह्यांची संख्या १२ वरून सहापर्यंत कमी झाली आहे. तो आता सहा जिल्ह्यांपुरता उरला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले.
 
सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे ध्येय आहे. त्यामुळे संपूर्ण विकासाच्या आड येणार्‍या नक्षलवादाचे समूळ उच्चाटण कठोरपणे केले जाणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत भारतातून नक्षलवाद हद्दपार केला जाणार असल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार डाव्या विचारसरणी किंवा नक्षली हिंसाचारग्रस्त जिल्ह्यात अजूनही नक्षलवादी कारवाया आणि हिंसाचार सुरूच आहे. २०१५ मध्ये सर्वात प्रभावित आणि २०२१ मध्ये 
 
चिंताजनक जिल्हे, अशी विभागणी केली आहे. सर्वात प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२ आहे.  देशात एकूण ३८ ठिकाणे आहेत. आता संख्या १२ वरून सहापर्यंत घसरली.  चार सर्वात नक्षलप्रभावित जिल्हे चार असून त्यामध्ये छत्तीसगढ (बिजापूर, कांकेर, नारायपणपूर आणि सुकमा), झारखंड (पश्चिम सिंघभूम) आणि महाराष्ट्रातील (गडचिरोली) यांचा समावेश आहे. त्याशिवाय  अन्य राज्यांत आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणातील ३८ जिल्हे आहेत. सातत्यपूर्ण कारवायांमुळे डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या १७ वरून कमी होत सहा झाली. त्यामध्ये छत्तीसगढ (दंतेवाड, गरीयाबंद आणि मोहला मनपूर, आंबगृह, चौकी), झारखंड (लटेहार), ओडिशा (नौपाडा) आणि तेलंगणा (मुलुगल) यांचा समावेश आहे.

Related Articles