E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
ऐसपैस शिक्षण , संदीप वाकचौरे
सध्या राज्यात राज्य मंडळाच्या शाळांमध्ये केंद्रीय परीक्षा मंडळाच्या शाळांसाठीचा अभ्यासक्रम राबवण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे. त्या संदर्भाने सध्या तरी नेमके काय पावले उचलली जाणार याबद्दल स्पष्टता नसली तरी आपणास ही पावले का उचलावी लागत आहेत? त्यामागे राष्ट्रीय स्तरावरून विविध अभ्यासक्रमांसाठी ज्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात, त्या परीक्षांमध्ये राज्याचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने हा विचार पुढे येत आहे. त्याचवेळी राष्ट्रीय आणि राज्य स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या उंचवायला हवी म्हणूनही हा विचार केला जात आहे.
साधारणपणे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. त्या दृष्टीने देशातील अनेक राज्यांनी यापूर्वीच कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम राज्य व केंद्रांचा समान असावा, या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. एकीकडे हे प्रयत्न होत असताना विज्ञान विषयाच्या परिस्थितीबाबत आपण किती गंभीरपणे विचार करतो आहोत, विज्ञान विषय शिकला जातो; मात्र त्याचवेळी विज्ञानाची ध्येये आणि उद्दिष्टांचा विचार रूजवण्यात आपल्याला खरेच यश मिळते आहे का? याचा शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे विज्ञानात पैकीच्या पैकी गुण मिळाले, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले, विशिष्ट अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला आणि अखेर पदवी मिळाली, त्यानंतर व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकलेले नाही हे आपल्या शिक्षणाचे वास्तव आहे. आज विज्ञान शाखेत शिकूनही अंधश्रद्धेच्या वाटांनी प्रवास करणारी माणसे आपल्या अवतीभोवती आहेत.
शिक्षणातील अपयश का?
मुळात आपल्याकडे शिक्षणातील अपयश लोटायचे झाले, तर ते अभ्यासक्रमावर लोटले जाते. त्यातून अभ्यासक्रम बदलण्याचा विचार पुढे येतो; मात्र त्यापेक्षा अधिक गरज आहे विज्ञानाचा मूलभूत विचार रूजवण्याची. आपल्याकडे शिकणे म्हणजे पाठ्यपुस्तक शिकणे. पाठ्यपुस्तक शिकवले की, अभ्यासक्रम पूर्ण झाला असे मानले जाते; मात्र त्यातील काय आणि किती रूजले गेले याचा विचार होत नाही. त्यामुळे चिंतन, मनन, विचाराची प्रक्रिया या संदर्भाने अधिक सखोल वाटा चालण्याची गरज वर्तमानात आहे. मुळात विज्ञान म्हणजे आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक आणि भौतिक जगाचा पद्धतशीर अभ्यास करणे असते. विज्ञान प्रकियेत निरीक्षण करणे, प्रश्न विचारणे, गृहीतके तयार करणे, प्रयोगाद्वारे गृहीतकांची चाचणी करणे, पुराव्यांचे विश्लेषण करणे, सातत्याने ज्ञानाचे दृढीकरण व पुनर्रचना करणे समाविष्ट आहे. यांसारख्या विविध मार्गाने जेव्हा प्रवास घडतो, तेव्हा जगाविषयीचे विश्वासार्ह ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते. खरेतर विज्ञानाची प्रक्रिया प्रयोगशाळांमध्ये घडते तेवढीच प्रक्रिया नाही. विज्ञानाची पद्धतशीर प्रक्रिया तर्कसंगत जीवन जगण्यासाठी क्षमतांचा विकास करणे अपेक्षित आहे. विज्ञानाचे अध्ययन हे आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल विश्वसनीय ज्ञान मिळवणे, तसेच वैज्ञानिक मूल्ये, क्षमता, स्वभाववृत्ती, कुतूहल, सर्जनशीलता, पुराव्यावर आधारित विचारप्रक्रिया व निर्णयासाठी सक्षम बनविते. शालेय स्तरावर जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व पृथ्वी विज्ञान या उपशाखांसोबतच गणित, संगणकीय विज्ञान व जिथे सहसंबंध असेल असे सामाजिकशास्त्र व व्यवसाय शिक्षण या शाखांमधील आंतरविद्याशाखीय आकलन व विज्ञानाची दैनंदिन जीवनातील भूमिका समजून घेण्यास मदत करते. मुळात शाळा स्तरावर जे काही विज्ञान शिकवले जाते, त्या माध्यमातून विज्ञान शिक्षणातून आपणास ध्येय साध्य करावयाचे आहे. पद्धतशीरपणे चिकित्सक वृत्तीने नैसर्गिक, भौतिक जगाचे वैज्ञानिक आकलन होणे हे विज्ञानाचे ध्येय आहे. त्या दिशेने विज्ञान सतत प्रयत्न करत आहे. त्यासाठी संशोधक गेले अनंत वर्ष सातत्याने विश्व निर्मितीचा शोध घेत आहे.
विज्ञानाच्या अध्ययनाने निरीक्षण, विश्लेषण आणि अनुमान यांसारख्या महत्त्वाच्या क्षमता विकसित होतात. यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक व सृजनात्मक विचार क्षमता, सुसंगत प्रश्न विचारणे, परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित विश्लेषण करणे व आवश्यक बदलांसाठी कृती करणे या दृष्टीने विचार करण्याची गरज असते. त्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये रूजल्या तर बरेच काही साध्य झाले असे म्हणता येईल. नैसर्गिक आणि भौतिक जगाच्या कार्यपद्धतीचे आकलन होण्यासाठी याचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे. विज्ञान शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी मूलभूत पद्धती, संकल्पना आणि सिद्धांत शिकण्याची गरज सातत्याने व्यक्त होते आहे. आपण आजवर त्या दिशेने फारसा प्रवास करू शकलो नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. विज्ञानाधिष्ठित चौकसवृत्ती गृहीतके, युक्तिवाद, भाकिते आणि विश्लेषण करण्याची क्षमता, तसेच गृहीतकांचा पडताळा घेणे, परिस्थितीचे मूल्यमापन करणे आणि तार्किक निष्कर्ष काढणे, हे विज्ञान अध्ययनाचे मूलभूत घटक आहेत. वैज्ञानिक ज्ञानाच्या उत्क्रांतीचे आकलन अनेक व्यक्ती आणि संस्था यांनी केलेल्या हजारो वर्षाच्या प्रयत्नांमधूनच वैज्ञानिक ज्ञानाच्या विकासामधील महत्त्वाचे ऐतिहासिक क्षण निर्माण झाले आहेत. हे महत्त्वाचे क्षण आणि वैज्ञानिक शोध समजून घेतल्याने विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक ज्ञान आणि विज्ञानाच्या पद्धती कशा विकसित झाल्या, त्याच बरोबर काळाच्या सोबत चालत असताना कालानुरूप कसे विकसित होत आहे या विषयी विद्यार्थ्यांचे आकलन व शोधकवृत्ती विकसित होण्यासाठीचे प्रयत्न शाळेत विज्ञान शिकवताना रूजवले जाणे अपेक्षित आहेत.
विज्ञानाच्या अध्ययनामध्ये आंतर-विद्याशाखीय आकलनाचा समावेश आहे. विज्ञानातील संकल्पना, तत्त्वे, नियम व सिद्धांत स्वतंत्रपणे न शिकता विश्वाच्या समग्र आकलनासाठी एकत्रितरीत्या त्यांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अशा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाच्या साहाय्याने विद्यार्थी जगाबद्दलची माहिती शोधतील व शिकतील यासाठी आपण किती आणि काय प्रयत्न करतो हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाज यांच्यामधील संबंध समजून घेणे, नैतिक पैलू आणि परिणामांसह विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाज यांच्याशी संबंधित समस्यांशी निगडित राहण्याची गरज आहे. चिकित्सक आणि सर्जनात्मक विचार करण्याची क्षमता विकसित करणे आणि भीती व पूर्वग्रहापासून मुक्त होणे हा विज्ञान अध्ययनाचा गाभा आहे. विद्यार्थी वैज्ञानिक मूल्ये आणि स्वभाववृत्ती जसे प्रामाणिकपणा, सचोटी, वस्तुनिष्ठता, दृढता, चिकाटी, सह्योग आणि सहकार्य, सजीवांचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यास सक्षम होतील, त्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे अध्ययन अनुभव देतो हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
सभोवतालचे जग समजून घेण्याचा प्रयत्न विज्ञानाद्वारे गेले अनेक वर्ष केला जात आहे. विज्ञानाच्या संकल्पनांमध्ये गुंतून राहण्यासाठी सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आवश्यक आहे. विज्ञान सभोवतालच्या जगातील घटना समजून घेण्यासाठी आणि नवनवीन शोध घेण्यासाठी विविध पद्धती व आवश्यक तंत्रे उपलब्ध करून देते. या पद्धती आणि साधने अनुभवजन्य पुराव्याद्वारे प्राप्त ज्ञान की, जे निरीक्षण, तर्कशुद्ध युक्तिवाद, अनुमान, प्रतिकृती या वेगवेगळ्या निकषांच्या आधारे प्रत्यक्ष जीवनातील विविध परिस्थितीमध्ये तपासले जाऊ शकते. वैज्ञानिक ज्ञान सतत विकसित होत असते.
वर्तमानातील आव्हाने
एकीकडे विज्ञानाचे ध्येय आपण समजून घेत असताना ते कितपत साध्य झाले याचा शोध घेण्याची गरज आहे; मात्र त्या दिशेने किती प्रयत्न होतात याचा विचार करावा लागणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्यात देखील विज्ञान विषयाच्या संदर्भाने वर्तमानातील आव्हाने जी आहेत त्यासंदर्भात बरेच काही बोलले गेले आहे. वर्तमानात अनेक आव्हाने आहेत. त्यातील मोजक्या आव्हानांचा विचार केला, तर त्यामध्ये कृतियुक्त अध्ययनापेक्षा संकल्पना, तथ्ये, व्याख्या इत्यादी सैद्धांतिक माहिती शिकवण्यावर भर दिला जातो आहे. मुळात शिकण्यासाठी वेळ हवा असतो. शिकणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतःच्या गतीने होत असते. अशावेळी पालक, शाळा सर्वांना निकालाची सर्वांना घाई आहे. प्रत्येकाला शिकण्यापेक्षा मार्कांशी स्पर्धा करायची आहे. मुले काय शिकतात? यापेक्षा त्यांना किती मार्क मिळाले हे महत्त्वाचे आहे. विज्ञानाला शंभरपैकी शंभर गुण मिळाले तरी त्या विद्यार्थ्याच्या विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतात. मुळात आपल्याकडे संकल्पनावर भर दिला जात नाही. पुस्तकात असलेली माहिती, व्याख्या, तथ्ये पाठ करण्याकडे अधिक कल आहे. पुस्तकातील व्याख्या पाठ करणे आणि ती आहे तशी लिहिणे म्हणजे मार्काची वाट आहे; मात्र एखादी गोष्ट शिकताना आपण कृतीने तो भाग जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून निरीक्षणाच्या माध्यमातून व्याख्या तयार करणे अपेक्षित आहे.
त्याचवेळी नव्या आव्हानांच्या बरोबर शालेय अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांचे शाळेबाहेरील निरीक्षण व अनुभव यांमधील परस्पर संबंधांचा अभाव असल्याचे मतही नोंदवण्यात आले आहे. शिक्षणाची व्याख्या होत असताना ती खूपच व्यापक आहे; मात्र आपल्याकडे शिक्षणाचा मूलभूत अर्थ हरवताना दिसतो. विद्यार्थी पुस्तक आणि शाळेत जेवढे शिकतो तेवढेच शिक्षण असे मानत आलो आहोत. विद्यार्थी शाळेच्या बाहेर अधिकाधिक शिकत असतो. प्रो. आईन्स्टाईम म्हणाले होते की, शाळेत शिकलेल्या गोष्टी विसरल्यानंतर जे उरते तेच म्हणजे शिक्षण. आता या विचारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर जीवनात पुस्तकातील काही आठवणे देखील कठीण आहे. आपल्याकडे दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला नववीतील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारला, तर त्या विरोधात लगेच ओरड होते. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न, मागील वर्षाचा प्रश्न म्हणून आरडाओरड होताना दिसते. एकदा परीक्षा दिली की, त्या वर्षाचा अभ्यास संपला. पुन्हा त्याची गरज उरत नाही. परीक्षा आणि अभ्यास यांचेच केवळ नाते उरले आहे. त्यामुळे जीवन आणि शिक्षण यांच्या नात्याची वीण अधिक घट्ट करण्याची गरज आहे. जीवनात मिळणारे अनुभव हा देखील शिक्षणाचा भाग ठरायला हवा. वरवर आपण ते आहे असे म्हणत असलो तरी त्या वाटा चालताना दिसत नाही. आपल्याकडे विनोबांच्या भाषेत जे शाळेत शिकतात ते जीवन जगत नाही आणि जे जीवन जगतात ते शिक्षण घेत नाही. जीवन आणि शिक्षण यांचे नाते तुटत चालले आहे. त्यामुळे विज्ञानाचा विषय आपल्या जगण्यात अधोरेखित होत नाही. त्यामुळे शिकणे परिणामकारक होत नसल्याने जीवनात समस्या आहेत आणि त्याची उत्तरे विज्ञानात आहे; मात्र विज्ञानात उत्तरे असली तरी ती उत्तरे केवळ परीक्षेत लिहिण्यापुरताच तो भाग आहे. त्या उत्तरात जीवनाच्या समस्या निराकरणाचा विचार नाही. त्यामुळे वर्तमानातील विज्ञानाच्या पुढे जे आव्हान आहे, ते जीवन आणि शिक्षण यांच्यातील तुटलेले नाते हे महत्त्वाचे आहे. त्याबद्दल विचार केला गेला नाही, तर भविष्यात पदव्या मिळाल्या तरी आनंद, शहाणपणाची वाट चालण्याची शक्यता नाही.
पायाभूत सोयी सुविधांचा अभाव हे आपल्याही राज्यातील विज्ञान विषयाच्या निष्पत्ती साध्यतेसमोरील मोठे आव्हान आहे. विज्ञान विषय शिकवला जातो; मात्र त्याचवेळी तो विषय, संकलप्ना शिकवत असताना त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळा, प्रयोगासाठी लागणारे साहित्य उपलब्ध नाहीत हे वास्तवही लक्षात घ्यायला हवे. अनेक ठिकाणी प्रयोगशाळा या फक्त कायद्याचे निकष पूर्ण करण्यापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. त्यामुळे विज्ञान शिकवले जात असले तरी कोणत्याही अनुभवाशिवाय केवळ वर्गात पोपटपंची करत शिकवले जात असेल, तर अपेक्षित साध्यता होण्याची शक्यता नाही. ही आव्हाने आपल्या समोर असताना आपण कोणताही अभ्यासक्रम राबवण्याचा विचार केला, तरी अपेक्षित साध्यता साधली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे बदलाच्या दिशेने उंच भरारी घ्यायची असेल, तर आपल्या समोर जी आव्हाने नोंदवली गेली आहेत, ती निराकरणासाठी प्रथम पावले टाकण्याची गरज आहे. त्याशिवाय गुणवत्तेची वाट सापडण्याची शक्यता नाही.
Related
Articles
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
गाझामध्ये युद्धबंदीसाठी हमास तयार
31 Mar 2025
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
31 Mar 2025
मुंबई-अहमदाबाद मार्गावर टँकर उलटला; चालकाचा मृत्यू
31 Mar 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
गाझामध्ये युद्धबंदीसाठी हमास तयार
31 Mar 2025
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
31 Mar 2025
मुंबई-अहमदाबाद मार्गावर टँकर उलटला; चालकाचा मृत्यू
31 Mar 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
गाझामध्ये युद्धबंदीसाठी हमास तयार
31 Mar 2025
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
31 Mar 2025
मुंबई-अहमदाबाद मार्गावर टँकर उलटला; चालकाचा मृत्यू
31 Mar 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
गाझामध्ये युद्धबंदीसाठी हमास तयार
31 Mar 2025
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
31 Mar 2025
मुंबई-अहमदाबाद मार्गावर टँकर उलटला; चालकाचा मृत्यू
31 Mar 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात