E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
अंतरिक्षातून परतल्यावर...!
Samruddhi Dhayagude
31 Mar 2025
अरविंद परांजपे, (ज्येष्ठ अंतराळ अभ्यासक)
अवकाशवीर सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातील प्रदीर्घ वास्तव्यानंतर तीन सहकार्यांसह सुखरुप पृथ्वीवर परतल्या. मात्र वातावरणविरहित अवस्थेतून वातावरणाचा सराव होईपर्यंतचा काळ या चारही अंतराळवीरांसाठी महत्त्वपूर्ण असेल. अंतराळ स्थानकातील दीर्घ वास्तवामुळे त्यांच्या शरीर आणि मनावर झालेले परिणाम, त्याचे गांभीर्य जाणून उपाय करण्यात पुढचा काही काळ जाणार आहे.
अंतराळ स्थानकातील लांबलेले दीर्घ वास्तव संपवून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या तीन साथीदारांसह पृथ्वीवर सुखरुप परतल्यामुळे जगाने आनंद व्यक्त केला . या अंतराळवीरांच्या काही शारीरिक तपासण्या सुरू असून लवकरच ते कुटुंबियांबरोबर सामान्य आयुष्य जगू लागतील. त्यांचा संपूर्ण प्रवास, अंतराळ स्थानकातील वास्तव, तिथे आलेला अनुभव, त्यातून मिळालेल्या माहितीचा मोठा साठा आदी उपलब्ध असल्यामुळे पुढच्या योजनांसाठी चांगली मदत होईल यात शंका नाही.
मुळातच अशा घटनांमागील तांत्रिक, मानसिक आणि शारीरिक आव्हानांचा विचार, प्रगत तंत्रज्ञानाचा आविष्कार हे सगळेच मुद्दे विचारात घेण्याजोगे ठरतात. याचे कारण अंतराळातील जीवन हा एका वेगळ्या विश्वाचा अनुभव असतो. यामध्ये रोजच्या जीवनाच्या प्रत्येक बाबीमध्ये बदल घडवणारे अनेक मुद्दे त्यात अंतर्भूत असतात. स्वाभाविकच पृथ्वीवर परत आल्यानंतर त्याचा परिणाम होतो. सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्यांनी अनुभवले ते केवळ एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही तर मानवी जीवनाच्या सीमा ओलांडणारे देखील आहे. त्यांना आलेल्या अडचणी, त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे लक्षात घेऊन आवश्यक ते बदल केले गेले, तर नक्कीच पुढील योजना अधिक चोख आणि निर्दोषपणे आयोजित होतील. अंतराळात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी उपयुक्त ठरू शकतो कारण अशा प्रकारच्या अनुभवामुळे, मानवजातीला आपल्या शरीराची, मनाची आणि तंत्रज्ञानाची नवीन सीमा ओलांडण्याची संधी मिळते.
अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. त्यामुळे शारीरिक बदलांच्या रुपाने त्याचा परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ, हाडांची घनता कमी होते, मांसपेशींमधील ताकद कमी होते, रक्ताभिसरणामध्ये बदल होतो. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर शरीरातील रक्त पायाकडे जाते. मात्र अवकाशात ते खाली जात नसल्यामुळे मेंदूमध्ये जमा होऊन त्याचा मेंदू, डोळे वा शरीराच्या अन्य अवयवांवर परिणाम होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळेच शारीरिक स्थिती सामान्य राखण्यासाठी अवकाशात शास्त्रज्ञांना किमान दोन तास व्यायाम करावा लागतो. तरीदेखील काही शारीरिक परिणाम बघायला मिळू शकतात. त्यामुळेच अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यावर विविध चिकित्सा पद्धतींद्वारे त्यांच्या शारीरिक बदलांची माहिती संकलित केली जाते. आता सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्यांचीही अशाच प्रकारे शारीरिक चिकित्सा केली जाईल.अवकाशातील गुरुत्वाकर्षणरहित अवस्थेत झोपण्यापासून अन्य शरीरधर्म पाळताना वेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. उदाहरणार्थ, एका ट्यूबमध्ये शरीर बांधून झोपायचे, एका टट्यूबमध्ये शौच वा लघवी करायची, ब्रश केल्यावर तोंड विशिष्ट प्रकारच्या कागदाने स्वच्छ करुन तो गिळून टाकायचा, लघवीवाटे उत्सर्जित झालेले पाणी पूर्ण निर्जंतुकीकरण केल्यानंतर पुन्हा पिण्यासाठी वा अन्य कारणांसाठी वापरायचे असे अनेक प्रकार अंतराळातील वास्तव्यात करावे लागतात. तेथे अंतराळवीरांना जेवायला आवडीचे पदार्थ दिले जात असले आणि वारंवार पुरेशी रसद पोहोचवली जात असली तरी पृथ्वीवर उपलब्ध असणार्या अन्नाशी या पॅकबंद अन्नाची बरोबरी होऊ शकत नाही. त्यामुळेच दीर्घकाळानंतर पृथ्वीवर परतलेल्या अवकाशवीरांना सामान्य स्थितीत येण्यास काही अवधी लागतो.साधारणपणे आठवडाभरात ते सामान्य स्थितीला सरावतील आणि नवीन दिनक्रमाची सवय लागेल. अंतराळात असताना त्यांनी वेळेचे व्यवस्थापन केले तेच काही दिवस त्यांच्या पृथ्वीवरील जीवनातही लागू होईल. थोडक्यात पृथ्वीवर परतल्यावर शरीरातील अनुकूलता साधण्यासाठी काही काळ जाणे आवश्यक असेल. यामध्ये योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक तयारीचा समावेश असू शकतो. तसेच अंतराळात असताना आलेल्या मानसिक दडपणाचाही विचार केला जाईल आणि मनाचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यकता भासल्यास उपाय केले जातील.
अशा प्रकारच्या मोहिमांमुळे केवळ अंतरिक्षासंदर्भातच नाही तर समाजातील अन्य क्षेत्रांमध्येही प्रगती होत असते. शिक्षण, तंत्रज्ञान, औद्योगिक विकास यामध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येतो. नवीन विचारधारा, शोध आणि विकास गतीमान होण्यास अशा मोहिमा कारक ठरतात आणि समाजाच्या प्रगतीस चालना देईल.
पृथ्वीवर वातावरण असल्यामुळे घातक सूर्यकिरणांपासून आपला बचाव होतो. मात्र अंतराळात वातावरण नसल्यामुळे अंतरिक्ष स्थानकात वास्तव करणार्यांना हे संरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या कर्करोगाचा धोका असतो. या दृष्टीनेही पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीरांच्या काही चाचण्या केल्या जातील. इतकेच नव्हे तर दीर्घकाळ अंतराळात वास्तव्य करणार्यांच्या शरीरातील पेशी, डीएनएमध्येही परिवर्तन होऊ शकते. दीर्घकाळ बाहेरच्या जगाशी संबंध न राहिल्याने यांना ‘स्पेसलाइट असोसिएटेड न्यूरो ऑक्युलर सिंड्रोम’ला तोंड द्यावे लागू शकते. यात डोळ्यांच्या नसांवर दबाव पडतो, दृष्टी कमकुवत होते. परिणामी, त्यांना या संकटातून वाचण्यासाठी काही दिवस निगराणीखाली रहावे लागेल. ताकद राखण्यासाठी तसेच हाडांमधील बळकटी परत मिळवण्यासाठी कठोर प्रशिक्षणातून जावे लागेल.
सुनीता यांच्या आधी अनेक अंतराळवीर अंतराळात दीर्घकाळ राहिले आहेत. रशियाचे वालेरी यांनी सर्वाधिक ४३७ दिवस राहण्याचा विक्रम नोंदवला होता. गेल्या वर्षी अमेरिकन अंतराळवीर फ्रँक ३७१ दिवसांच्या मुक्कामानंतर पृथ्वीवर परतले होते. त्यांच्या शरीरात अनेक व्याधी निर्माण झाल्याचे दिसले. दृष्टीसंबंधी समस्या, डीएनएमध्ये बदल, वजन कमी होणे, रोगप्रतिकारशक्तीत कमतरता असे बदल दिसून आले होते. त्यावरून अंतराळातील वास्तव्य वाढल्याचे काय दुष्परिणाम होतात याची कल्पना येऊ शकते.१४ अंतराळवीरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात युनिव्हर्सिटी ऑफ ओटावाच्या संशोधकांना याबाबत माहिती मिळाली आहे. अभ्यासात समाविष्ट अंतराळवीरांमध्ये ब्रिटनच्या टिम पेक यांचाही समावेश होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये सहा महिने घालवले आहेत, तसेच अंतराळात विविध विषयांवर संशोधनही केले आहे. या मोहीमेदरम्यान, अंतराळवीरांच्या रक्त आणि श्वासोच्छवासाचे नमुने घेण्यात आले. शरीरात कमी झालेल्या तांबड्या पेशींची संख्या मोजण्यासाठी असे करण्यात आले. या पेशी फुफ्फुसांपासून संपूर्ण शरिरात ऑक्सिजन पुरवतात. जगण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असते. या संबंधातील अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि हॉस्पिटल फिजिशियन डॉ. गाय ट्रूडल यांनी म्हणतात, अंतराळात पोहोचल्यानंतर लाल रक्तपेशी नष्ट होत आहेत, हे आमच्या लक्षात आले. संपूर्ण मिशन दरम्यान ते सुरुच होते. मात्र, अंतराळात वजन जाणवत नसल्यामुळे तिथे असेपर्यंत ही फार मोठी समस्या भासत नाही. पृथ्वीवर परत आल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना अशक्तपणा आणि थकवा याची जाणीव होईल. शिवाय त्यांच्या स्नायूंची शक्तीही कमी होईल. अंतराळात दर सेकंदाला शरीरातून ३० लाख तांबड्या पेशी नष्ट होतात. जमिनीवर असताना केवळ दोन लाख पेशीच नष्ट होतात. मात्र, शरीर पुन्हा त्याची भरपाई करते. तसे न झाल्यास अंतराळ प्रवासी अंतराळात गंभीर आजारी पडतात. पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता आणि त्यांचे सहकारी लवकरच सामान्य आयुष्य जीवन सुरु करतील अशी आशा आहे.
Related
Articles
चारशेवरून रेल्वे अपघातांचे प्रमाण ८१ पर्यंत घटले : वैष्णव
03 Apr 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
म्यानमारला आणखी महिनाभर बसणार भूकंपाचे धक्के
01 Apr 2025
वीज होणार स्वस्त
30 Mar 2025
१ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’
04 Apr 2025
चारशेवरून रेल्वे अपघातांचे प्रमाण ८१ पर्यंत घटले : वैष्णव
03 Apr 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
म्यानमारला आणखी महिनाभर बसणार भूकंपाचे धक्के
01 Apr 2025
वीज होणार स्वस्त
30 Mar 2025
१ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’
04 Apr 2025
चारशेवरून रेल्वे अपघातांचे प्रमाण ८१ पर्यंत घटले : वैष्णव
03 Apr 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
म्यानमारला आणखी महिनाभर बसणार भूकंपाचे धक्के
01 Apr 2025
वीज होणार स्वस्त
30 Mar 2025
१ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’
04 Apr 2025
चारशेवरून रेल्वे अपघातांचे प्रमाण ८१ पर्यंत घटले : वैष्णव
03 Apr 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
म्यानमारला आणखी महिनाभर बसणार भूकंपाचे धक्के
01 Apr 2025
वीज होणार स्वस्त
30 Mar 2025
१ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’
04 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात