बेपत्ता तरुणीचा मृत्यू झाल्याचे घोषित करा   

पालकांची मागणी 

न्यूयॉर्क : अमेरिकेची रहिवासी आणि भारतीय वंशाची तरुणी सुदीक्षा कोनकी (वय २०) नुकतीच बेपत्ता झाली आहे. तिला मृत घोषित करावे, अशी मागणी तिच्या पालकांनी डोमिनिक रिपब्लिक देशाकडे केली आहे. सुदीक्षा सुट्टीसाठी डोमिनिक रिपब्लिक देशात गेली होती. ६ मार्च रोजी पुटा काना शहरातील रियू रिपब्लिक रेसॉर्टवर ती शेवटची दिसली होती. यानंतर ती गायब झाली होती. तिच्या पालकांनी आता तिचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर करावे, अशी विनंती करणारे एक पत्र पाठवले आहे, अशी माहिती डोमिनिक रिपब्लिकच्या पोलिस दलाचे प्रवक्ते दियेगो सेक्युरा यांनी दिली. दरम्यान, सुदीक्षाच्या परिचयातील जोसुआ स्टीव्हन रिबे याचा पासपोर्ट तपासणीसाठी पोलिसांनी जप्त केला आहे सुदीक्षा बेपत्ता प्रकरणातील तो एक संशयित असल्यामुळे त्याची सहा तास चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

Related Articles