टेस्लाच्या मोटारींकडे ग्राहकांची पाठ   

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची इलेक्ट्रीक मोटार लवकरच भारतात येणार आहे. टेस्ला मोटार आपल्या अत्याधुनिक फीचर्समुळे जगभर लोकप्रिय आहेत. अनेक भारतीय ग्राहक टेस्ला मोटारीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, सध्या इलॉन मस्क यांचे वाईट दिवस आल्याचे दिसत आहेत. कारण, जगातील अनेक देशांमध्ये कंपनीच्या मोटार विक्रीत घट झाली आहे. गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी टेस्ला आता अनेक आकर्षक ऑफर्स ग्राहकांना देत आहे.
  
इलॉन मस्क सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. कारण, मस्क यांचा सरकारमध्ये समावेश केल्यानंतर त्यांनी मनमानी पद्धतीने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारचा खर्च कमी करण्यासाठी मस्क यांनी नोकरकपातीचे फर्मान काढले आहे. याविरोधात ग्राहक आता टेस्ला मोटारीच्या शोरुमबाहेर आंदोलन करत आहेत. तर बायकॉट टेस्ला म्हणून चळवळही चालवली जात आहे. अशा परिस्थितीत मस्क ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी नवीन ऑफर्स देत आहेत.
काय आहेत ऑफर? 
   
टेस्ला आपल्या गाड्या विकण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर्स देत आहे. यामध्ये शून्य टक्के व्याजदर ते आयुष्यभर मोफत चार्जिंगचा समावेश आहे. काही मोटारीसाठी कर्जावर खूप कमी व्याजदर आहेत. टेस्लाने सायबर मोलमोटार नावाची मोटार लॉन्च केली आहे. त्याची विक्री करण्यासाठी कंपनीला मोठी कसरत करावी लागत आहे. कंपनी या मोटारीसाठी १.९९ टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. हे कर्ज फक्त टेस्ला मार्फतच फायनान्स केले जाऊ शकते.लाईफ टाईम फ्री चार्जिंग कंपनी टेस्ला सुपरचार्जर्सला वाहनाला लाईफ टाईम फ्री चार्जिंगची सेवा देत आहे. जगभरात ६० हजाराहून अधिक सुपरचार्जर्स आहेत, जे टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनांना २०० मैल (सुमारे ३२२ किमी) फक्त १५ मिनिटांत चालवण्यासाठी रिचार्ज करू शकतात.

Related Articles