मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा   

इंफाळ : मणिपूरमध्ये आतापर्यंत एक हजारांवर शस्त्रे नागरिकांनी सुरक्षा रक्षकांकडे जमा केली आहेत. गेल्या वर्षी राज्यात वांशिक हिंसाचार उफाळून आला होता तेव्हा सरकारच्या शस्त्र गोदामातून नागरिकांनी शस्त्रे लुटून नेली होती. ती आता परत करण्यात आली आहेत. 
 
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंंतर राज्यपालांनी नागरिकांना त्यांच्याकडे असलेली शस्त्रे दोन आठवड्यांत सुरक्षा रक्षकांकडे सोपविण्याची मुदत दिली होती. आतापर्यंत एक हजार शस्त्रे परत केली आहेत. पण, त्यांची संख्या त्या पेक्षा अधिक असावी, असा अंदाज आहे. ती जमा व्हावीत, यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून विविध राज्यात ती जमा करता यावीत, यासाठी मोहीम राबविली आहे. सरकारी गोदामातून लुटून नेलेली आणि स्वत:हून खरेदी केलेली शस्त्रे नागरिकांनी परत करावीत, असे आवाहन राज्यपाल यांनी केले आहे. त्यामध्ये हातबाँब, मशीन गन, बंदुका, छोट्या तोफा आणि इन्सास व एके ५६ रायफलींचा समावेश आहे. आतापर्यत १ हजार २३ शस्त्रे नागरिकांनी जमा केली असल्याचे सांगण्यात आले. 

Related Articles