E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नगरपरिषदांनी केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
पुणे
: जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्यांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी योजनांचा लाभ आपल्या भागातील पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोधान, महाअभियान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, नमामी चंद्रभागा अभियान या योजनांवर विशेष लक्ष केंद्रीत करून यांची नियोजन बद्ध अंमलबजावणी करावी.
नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया यांचे सुयोग्य नियोजन करावे. घनकचरा व सांडपाणी यांसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात तसेच आपल्या भागातील सर्व नागरिकांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. सुरळीत पाणी पुरवठ्यासंदर्भात वॉटर मीटर बसविण्यासाठी कार्यवाही करावी. १०० टक्के मीटरींग करून घ्यावे. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळेल तसेच नगरपरिषद क्षेत्रात अर्बन हेल्थ सेंटर उभारण्यात यावेत. यासाठी सध्या तात्पुरत्य स्वरूपात जागा उपलब्ध करून घ्यावी. अर्बन हेल्थ सेंटरमध्ये चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे आपला दवाखाना या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
नगरपरिषद क्षेत्रात आदर्श शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शहरातील मालमत्ता कर संदर्भात ड्रोनद्वारे पाहणी करून १०० टक्के मालमत्ता कराची आकारणी करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत शासनाचा १०० दिवसाच्या नियोजन आराखड्या संदर्भात आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
Related
Articles
वृद्धांच्या सहवासाला नवा दृष्टिकोन देणारी 'हॅप्पी सिनियर्स'
14 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझर
14 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुधारणांसाठी समिती
11 Mar 2025
वृद्धांच्या सहवासाला नवा दृष्टिकोन देणारी 'हॅप्पी सिनियर्स'
14 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझर
14 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुधारणांसाठी समिती
11 Mar 2025
वृद्धांच्या सहवासाला नवा दृष्टिकोन देणारी 'हॅप्पी सिनियर्स'
14 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझर
14 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुधारणांसाठी समिती
11 Mar 2025
वृद्धांच्या सहवासाला नवा दृष्टिकोन देणारी 'हॅप्पी सिनियर्स'
14 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझर
14 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुधारणांसाठी समिती
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?